मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे शिवसेना जिल्हाप्रमुखाला ठेवलं नजर कैदेत

मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे शिवसेना जिल्हाप्रमुखाला ठेवलं नजर कैदेत

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

बीड, 6 फेब्रुवारी : मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील सभेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

बीड शहरातील क्रीडांगणाला छत्रपती संभाजी महाराज याचं नाव देण्यात यावं, अन्यथा आंदोलन केलं जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गदारोळ नको म्हणून मग सचिन मुळूक यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

सचिन मुळूक यांनी आंदोलनाचा इशारा दिला असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात काही होईल या भीतने पोलीस प्रशासनाने मंगळवारी रात्रीपासूनच त्यांना नजरकैदेत ठेवलं. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री फडणवीसांची सभा पार पडल्यानंतर पोलिसांनी जिल्हा प्रमुखांवरील खडा पहारा उठवला.

काय आहे प्रकरण?

बीड नगरपरिषदेने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या मल्टीपर्पज क्रीडांगणाच्या नावावरून गेल्या काही दिवसा पासून वादंग सुरु आहे. नगर पालिकेने दिवंगत केशर काकू क्षीरसागर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करत मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आखला. त्यानंतर मग काही तरुणांनी मध्यरात्री या मैदानाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज यांचा नावाच फलक लावला. दोन दिवसांपूर्वी त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

'प्रशासनाने आम्हाला फसवलं. आता मात्र आम्ही शांत बसणार नाहीत. लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करु,' अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली आहे.

VIDEO : पंकजांच्या चिक्की घोटाळ्यावर धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा

First published: February 6, 2019, 11:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading