अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलेने 200 गरीब मुलींना दाखवला 'छपाक'

अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलेने 200 गरीब मुलींना दाखवला 'छपाक'

अर्चनावर तब्बल सात वर्षे उपचार चालले. लाखो रुपये खर्च झाले. तरी अर्चनाला उजवा डोळा, उजवा कान कायमचा निकामी झाला.

  • Share this:

किशोर गोमाशे,(प्रतिनिधी)

वाशिम,19 जानेवारी: एकतर्फी प्रेमातून 2003 मध्ये झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या वाशिम शहरातील अर्चना शिंदे यांनी तब्बल 200 गरीब मुलींना सवलतीच्या दरात 'छपाक' सिनेमा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे स्वतः वर झालेला अ‍ॅसिड हल्ला किती भयानक होता, हे अर्चना शिंदे यांनी प्रत्येक शाळेत जाऊन आपबिती सांगत हल्ल्याची दाहकता कथन केली.

दरम्यान अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित 'छपाक' सिनेमा रिलीज झाल्यामुळे मल्टिप्लेक्स सिनेमागृहाच्या मालकांना विनंती करून 50 टक्के सवलतीच्या दरात त्यांनी 200 मुलींना सिनेमा दाखवण्याची व्यवस्था केल्यानं मुलींनी अ‍ॅसिड हल्ल्यातील तरुणीची कहाणी समजेल, असा विश्वास अर्चना शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

एकतर्फी प्रेमातून झाला Acid Attack

अर्चनाने सांगितले की, 4 जानेवारी 2003 रोजी ती नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकला जात होती. तिच्या पाठीमागून तिच्या मानेवर एका माथेफिरूने ज्वलनशील द्रव्य फेकले. ते दुसरे-तिसरे काही नसून ते अ‍ॅसिड होतं. तिने मागे वळून पाहताच हल्लेखोराने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. गंभीररित्या भाजल्या गेल्या अर्चनाला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अर्चनावर तब्बल सात वर्षे उपचार चालले. लाखो रुपये खर्च झाले. तरी अर्चनाला उजवा डोळा, उजवा कान कायमचा निकामी झाला.

दरम्यान, 'छपाक' हा सिनेमा दिल्लीतील अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या रिअल लाइफ स्टोरीवर आधारित आहे. काही युजर्सचं म्हणणं होतं की, लक्ष्मीवर अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नदीम खान असं होतं. मात्र सिनेमात त्या व्यक्तिरेखेचं नाव राजेश असं ठेवण्यात आलं आहे. यावरुन मेकर्सनी असं जाणून बुजून केल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण जवळपास दोन वर्षानंतर ‘छपाक’मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी तिचा पद्मावत सिनेमा रिलीज झाला होता. ज्यावर ऐतिहासिक मुद्द्यांवरुन काही आरोप करण्यात आले होते.

दीपिकाच्या 'छपाक'बाबत घेतला मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या 'छपाक'वरून सध्या देशभर चर्चा सुरू आहे. दीपिका जेएनयुमधल्या विद्यार्थ्यांना भेटायला गेली आणि वादाची ठिणगी पडली. 'छपाक'वर बहिष्कार घाला अशी मागणी होऊ लागली होती. तर त्याला जोरदार विरोधही सोशल मीडियावर करण्यात आला होता. भाजपने दीपिकावर टीकेची झोड उठवली होती. तर काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी तिला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित तीन राज्यांनी दीपिकाच्या 'छपाक'ला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घोषित केला होता. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडमध्ये छपाक टॅक्स फ्री दाखवला जातो. 'छपाक' टॅक्स फ्री केल्यानंतर राजकारण सुरू झालं होतं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 19, 2020 04:56 PM IST

ताज्या बातम्या