अ‍ॅसिड हल्ला, पोलिसांवर गोळीबार आणि आत्महत्या; पुण्यात सिनेस्टाईल थरारक घटना

अ‍ॅसिड हल्ला, पोलिसांवर गोळीबार आणि आत्महत्या; पुण्यात सिनेस्टाईल थरारक घटना

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु, हल्लेखोरांनी पोलिसांवरही गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

  • Share this:

वैभव सोनवणे, प्रतिनिधी

पुणे, 16 एप्रिल :  सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज अ‍ॅसिड हल्ला आणि हल्लेखोराच्या आत्महत्येची थरारक घटना घडली आहे. हल्लेखोराने आधी एका तरुणावर अ‍ॅसिड फेकले आणि पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

टिळक रोडवरील बादशाही बिल्डिंगच्या परिसरात ही घटना घडली. रोहित खरात हा तरूण आपल्या मैत्रिणीसोबत बोलत उभा होता. तेव्हा कलशेट्टी नावाच्या हल्लेखोराने रोहितवर अ‍ॅसिड फेकले. अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु, हल्लेखोराने पोलिसांवरही गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर हा नजीकच्या एका इमारतीत शिरला. पोलीस आणि हल्लेखोरामध्ये जवळपास 2 तास धुमश्चक्री उडाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानही पोहोचले. तब्बल दोन तासांच्या धुमश्चक्रीनंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तो अपयशी ठरला. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हा हल्ला नेमका कशासाठी आणि का करण्यात आला होता. या पोलीस तपास करत आहे.

=====================

First published: April 16, 2019, 11:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading