बीड, 4 मे- किरकोळ घरगुती भांडणातून एकाच्या अंगावर अॅसिड फेकून चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात उघडकीस आली आहे. या घटनेत एक गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. क्षुल्लक भांडणात अॅसिडचा वापर झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
माजलगाव शहरातील कालिका नगर येथे राहणाऱ्या अहमद जैनुद्दीन जर्गर, नजीब जर्गर व इर्शाद जर्गर या तीन भावांच्या जागेचे घरगुती भांडण झाले. इर्शाद याचे मेहुणे समीर हे भांडण सोडवायला गेले होते. मात्र, अहमद आणि नजीब याने इर्शादच्या कुटुंबातील लोकांच्या अंगावर चक्क अॅसिड फेकले. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत.
या हल्यात समीर शेख मेहबूब शेख (वय- 35 वर्षे), शेख मकसूद (वय- 38 वर्षे), दिना इर्शाद जर्गर (वय- 8 वर्षे) व अलशफात इर्शाद जर्गर (वय- 15 वर्षे) यासह रेश्मा इर्शाद जर्गर (वय- 33 वर्षे) हे जखमी झाले आहेत.
दुसऱ्या घटनेत माजलगावात दुपारी दोन युवकावर चाकू हल्ला झाला. जखमी युवकांवर माजलगाव रुग्णालयात उपचार सूरु आहेत. शहरातील कालिकानगर येथे आज दुपारी अशोक महादेव हाटवटे (वय- 28), प्रवीण वचिष्ट कोळसे (वय-22) या दोघांवर किरकोळ भांडणातून चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
टोल नाक्यावर माकडाचा डल्ला, VIDEO व्हायरल