मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दोन लाखांच्या इनामाचा खुद्द मुख्य आरोपीलाच मोह, उमेश कोल्हे घटनेच्या तपासात काय घडलं ?

दोन लाखांच्या इनामाचा खुद्द मुख्य आरोपीलाच मोह, उमेश कोल्हे घटनेच्या तपासात काय घडलं ?

 नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं 21 जून रोजी धारदार शस्त्राने उमेश कोल्हेंची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

अमरावती, 22 सप्टेंबर : नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं 21 जून रोजी धारदार शस्त्राने उमेश कोल्हेंची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अमरावतीचे उमेश कोल्हे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी शहीम अहमद हा न्यायालयात समर्पण करण्यासाठी आला होता. मात्र त्यावेळीच NIA ने बेकायदेशीररित्या अटक केली असा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. आरोपी शहीम अहमद याला मुंबई सत्र न्यायालय विशेष कोर्टात रिमांडसाठी आज हजर करण्यात आले. NIA ने आरोपी शहीम अहमद याची 14 दिवसांची NIA कस्टडीची मागणी केली. मात्र त्यास 9 दिवसाची NIA कोठडीत पाठवण्यात आले आहे. शहिम अहमद या आरोपीवर 2 लाखांचे बक्षीस NIA ने ठेवले होते. उमेश कोल्हे हत्या प्रकरण: 2 महिने उलटले तरी आरोपीचा पत्ता मिळेना, NIA कडून मोठी घोषणा आरोपी स्वतः न्यायालयात आला होता आणि न्यायालयीन प्रक्रिया करत होता. मात्र त्याचवेळेस NIA ने त्याला अटक केली. तर आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला आहे की हि अटक बेकायदेशीर आहे. तर आरोपीसाठी 2 लाख रुपये बक्षीस ठेवले होते ते आपल्यालाच मिळावे म्हणून त्याने कोर्टात समर्पण केले आहे. त्यामुळे स्वतः लाच आरोपीने अटक करून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे.
First published:

Tags: Amravati, Crime news

पुढील बातम्या