Home /News /maharashtra /

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू, आईने केला धक्कादायक आरोप

बलात्कार प्रकरणातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू, आईने केला धक्कादायक आरोप

टीकेश देवेंद्र लांजेवार या 32 वर्षीय इसमाला बलात्काराच्या गुन्ह्यात 11 महिन्यांपूर्वी अटक झाली होती.

अमरावती, 22 ऑगस्ट : अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 11 महिन्यांपासून असलेल्या 32 वर्षीय कैद्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप या कैद्याच्या आईने केला आहे. अमरावतीच्या कल्याण नगर येथील टीकेश देवेंद्र लांजेवार या 32 वर्षीय इसमाला बलात्काराच्या गुन्ह्यात 11 महिन्यांपूर्वी अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. 21 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता टीकेशच्या घरी फ्रेझरपुरा पोलिसांनी येऊन त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती दिली. टीकेशच्या कुटुंबातील सदस्य रुग्णालयात गेले असता टीकेशचा मृतदेह आढळून आला. मृत्यूच्या 2 दिवस आधी18 ऑगस्ट रोजी टीकेशचे आईसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलणे झाले होते. त्यावेळी टीकेश अगदी व्यवस्थित होता,त्याची प्रकृती चांगली होती. मग अचानक टीकेशचा मृत्यू कसा झाला? त्याला 21 ऑगस्टला दुपारी साडे चार ते पाच वाजताच्या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मृत्यू होईपर्यंत घरी का निरोप देण्यात आला नाही? असा सवाल टीकेशच्या आईने उपस्थित केला आहे. तसंच आपल्या मुलाच्या मृत्यूस तुरुंग प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, यामुळे टीकेशच्या मृतदेहाचा पंचनामा न्यायाधीश व एक्झक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्या समक्ष करण्यात आला. तसंच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात शव विच्छेदन इन कॅमेरा करण्यात आले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amravati

पुढील बातम्या