Home /News /maharashtra /

फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, खडसेंचा गौप्यस्फोट

फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे.

    मुक्ताईनगर, 21 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडण्याची घोषणा केली आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करत असताना खडसे यांचा गळा भरून आला. 'माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता.  पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते , असा धक्कादायक खुलासा खडसेंनी केला. 'खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्ताराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली. 'भारतीय जनता पक्षाचे 40 वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही.  मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला होता, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकशी झाल्या' असं खडसे यांनी सांगितले. इतक्या दिवसांपासून खूप अत्याचार सहन केले. माझ्या चौकशीची मागणी कुणीही केली नाही. विधिमंडळातील रेकॉर्ड काढावे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोणताही पक्षा असेल त्यांनी राजीनामा आणि चौकशीची मागणी केली नव्हती. पण भाजपने माझ्या राजीनाम्याची मागणी केली आणि राजीनामा घेतला. त्यानंतर मी चार वर्ष काढले. पण, मला काही मिळाले नाही, अशी नाराजीही खडसेंनी व्यक्त केली. 'माझ्या कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली होती. एखाद्या मंत्र्याच्या पीएवर अशी पाळत ठेवणे हे धक्कादायक आहे. अशी माहिती विधानसभेत सुद्धा देण्यात आली होती, असंही खडसे यांनी सांगितले
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या