रविवार ठरला घातवार विविध अपघातात 9 जणांचा मृत्यू

रविवार ठरला घातवार विविध अपघातात 9 जणांचा मृत्यू

रविवारी विविध तीन अपघातांमध्ये 9 जणांचा बळी गेल्याने हा घातवार ठरला.

  • Share this:

मुंबई 12 जानेवारी : पेण जवळच्या जिते इथं रेल्वेखाली येऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. रेल्वे रुळाजवळ हे कामगार काम करत होते. मात्र त्यांना दुसऱ्या बाजूने रेल्वे आलेली कळलीच नाही. त्या रेल्वेने सर्व कामगारांना उडवलं. घटनास्थळी पोलीस आणि रूग्णावाहिका पोहोचली मात्र त्या सर्व कामगारांचा मृत्यू झाला. रेल्वेच्या डबल ट्रॅकचं काम सुरू होतं. काही कामगार जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

नगरमध्ये वाळू तस्कारांचा हैदोस

अहमदनगर - नगरमध्ये वाळू तस्करांनी हौदोस घातलाय.  वाळू ट्रकने 3 जणांना चिरडल्यान नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. पारनेर तालुक्यातील पळसे इथं ही घटना घडलीय. पारनेर तालुक्यात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातल्याची तक्रार वारंवार होतेय मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. हकनाक तीन जणांचा बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तीन मित्रांचा मृत्यू

भुसावळमध्ये तीन मित्रांनी एकाच वेळी आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत 3 तरुण मित्र जागीच ठार  झाले आहेत.

हा भीषण अपघात शिरपूर महामार्गवरील कन्हाळा फाट्याजवळ घडला आहे. हे तिघेजण खास मित्र असून 20 ते 24 वयोगटातील आहेत. सकाळी ते रस्त्यावरून जात असताना ट्रक चालकाने त्यांना मागून ठोकलं. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. शेख वजीर शेख रफीक, शेख समीर शेख हमीद, शेख जावेद शेख मोहिनुद्दीन अशी या तीन मित्रांची नावे आहेत.

First published: January 13, 2019, 11:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading