निवृत्त वडिलांनी दिला शहीद जवान मुलाला अखेरचा निरोप, गावाला अश्रू अनावर

निवृत्त वडिलांनी दिला शहीद जवान मुलाला अखेरचा निरोप, गावाला अश्रू अनावर

सिक्कीममध्ये रेसक्यू ऑपरेशन करण्यासाठी जात असताना सुजित किर्दत यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे अपघाती निधन झाले.

  • Share this:

सातारा, 23 डिसेंबर : सिक्कीममध्ये अपघाती निधन झालेले साताऱ्यातील (Satara) चिंचणेर गावचे शहीद जवान सुजित किर्दत (Sujit Kirdat) यांच्यावर आज त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सुमित किर्दत यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने गावकरी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

सिक्कीममध्ये रेसक्यू ऑपरेशन करण्यासाठी जात असताना सुजित किर्दत यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे अपघाती निधन झाले. सुजित किर्दत यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी पोहोचले त्यावेळी गावात रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांनी सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा गावातून  शोकाकुल वातावरणात काढण्यात आली.

टीव्ही अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; रोलसाठी दिग्दर्शकाने केली शय्यासुखाची मागणी

यानंतर किर्दत यांना पोलीस आणि सैन्यदलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी करत सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी, सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,आमदार महेश शिंदे,आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

ओढणी गुंडाळून सेल्फी घेण्याच्या नादात बसला गळफास; 12 वर्षांच्या मुलीचा गेला जीव

शहीद जवान सुजित किर्दत यांना मुलगा आर्यन किर्दत याने मुखाग्नी दिला. शहीद जवान सुजित किर्दत यांचे बंधू अजित किर्दत हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत तर त्याचे वडील देखील काही दिवसांपूर्वी सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले आहेत. अशा सैन्य दलात भरती होण्याचा वारसा जमणारे शहीद जवान सुजित किर्दत यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी,मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

शहीद जवान सुजित यांच्या जाण्याने किर्दत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 23, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या