Home /News /maharashtra /

यांना आवरा! दारुचे बॉक्स असलेल्या गाडीला अपघात, तळीरामांनी लंपास केल्या बाटल्या

यांना आवरा! दारुचे बॉक्स असलेल्या गाडीला अपघात, तळीरामांनी लंपास केल्या बाटल्या

टेम्पोत ड्रायव्हर, क्लिनरसह आणखी 2 प्रवासी होते. चौघे दारूच्या बॉक्स खाली दाबले गेले होते पोलीस व नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णलयात दाखल केले.

सटाणा 29 ऑक्टोबर:  देशी-विदेशी दारूचे बॉक्स घेऊन भरधाव वेगाने  जाणारा टेम्पो ट्रक पलटी होऊन 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सटाणा-देवळा मार्गावर घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दारूच्या बॉक्स खाली दबलेले ड्रायव्हर, क्लिनर व अन्य 2 प्रवाशांना बाहेर काढून त्यांना रुग्णलयात दाखल केले. मात्र त्या दरम्यान आजुबाजूनच्या लोकांनी गर्दी करत हे बॉक्स लंपास केल्याचाही प्रकार घडला. टेम्पोचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला होता. टेम्पो पलटी झाल्यानंतर या संधीचा फायदा घेत काही तळीरामानी रस्त्यावर पडलेले दारूचे बॉक्स व बाटल्या लंपास करून पोबारा केला. MH 15-AG 5886 हा टेम्पो ट्रक देशी-विदेशी दारूचे बॉक्स घेऊन नाशिक येथून बागलाणच्या तहाराबाद येथे भरधाव वेगाने जात असताना सटाणा-देवळा मार्गावर टायर फुटला आणि टेम्पो भर रस्त्यावर पलटी झाला. टायर फुटल्याचा आवाज ऐकुण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोत ड्रायव्हर, क्लिनरसह आणखी 2 प्रवासी होते. चौघे दारूच्या बॉक्स खाली दाबले गेले होते पोलीस व नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णलयात दाखल केले. कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ कायम, जाणून घ्या कोरोनाचे सर्व अपडेट्स टेम्पो पलटी झाल्यानंतर त्यातील दारूचे बॉक्स व बाटल्या रस्त्यावर पडलेल्या होत्या काही तळीरामानी संधी साधून दारूचे बॉक्स लंपास करून पोबारा केला. अपघातामुळे सटाणा-देवळा मार्गावरील वाहतूक काही ठप्प झाली होती. या आधीही अशा अपघातानंतर लोकांनी मदत करण्याचे सोडून दारु लंपास केली होती. अपघात नेमका कशामुळे झाला याची पोलीस चौकशी करत आहे. खराब असलेले रस्ते आणि त्याची फिकीर न करता भरधाव वेगाने जाणारी वाहनं यामुळे या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. खूशखबर! केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ पोलिसांनी अनेकदा सूचना करूनही वाहन चालक नियमांचं पालन करत नाहीत त्यामुळे अपघात होतात आणि अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे अशा वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर अनेक गाड्या या अवैध वाहतुक करत असतात. त्यांच्याकडे योग्य कागदपत्रही नसतात त्याचबरोबर गाडीची देखभालही योग्य पद्धतीने केली जात नाही.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या