सोलापुरात कार आणि ट्रकची धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

सोलापुरात कार आणि ट्रकची धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

अक्कलकोट आणि शिर्डीमध्ये दोन भीषण अपघात झाले आहेत.

  • Share this:

सोलापूर, 17 नोव्हेंबर: अक्कलकोट आणि शिर्डीमध्ये दोन भीषण अपघात झाले आहेत. या भीषण अपघातमुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर भरधाव कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. अक्कलकोट जवळील पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिर्डी जवळच्या राहाता शहरात दोन मलवाहू ट्रक एकमेकांवर धडकून रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. शिर्डी तसेच शनिशिंगणापूर जाणारी वाहतूक याच रस्त्यावरून होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर ही दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Published by: Kranti Kanetkar
First published: November 17, 2019, 12:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading