पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार-स्कुटीच्या धडकेत महिला जागीच ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार-स्कुटीच्या धडकेत महिला जागीच ठार

जखमींना इंदापूरमधील शासकीय रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

इंदापूर, 17 मे : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात (Accident on Pune Solapur Highway) एक महिला जागीच ठार झाली आहे. तर लहान मुलगी आणि एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. जखमींना इंदापूरमधील शासकीय रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलं आहे. महामार्गावर कार आणि स्कुटीची धडक होऊन हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात एक महिला जागीच ठार झाली.

कोरोनाच्या दहशतीमुळे लोक शहर सोडून आपल्या गावी प्रवास करत आहेत. हा अपघातातही कोरोनाच्या दहशतीमुळे गावाकडे निघालेल्या महिलेचाच बळी गेला आहे. मुंबईवरुन कर्नाटकला जात असताना अपघात झाला. अद्यापर्यंत मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहर सोडून मूळ गावी जाणाऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत रस्ते अपघातात 75 हून अधिक मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल (शनिवारी) दोन मोठे रस्ते अपघात झाले आहेत. पहिली घटना उत्तर प्रदेशमधील औरैया येथे आणि दुसरी घटना मध्य प्रदेशच्या सागरमध्ये घडली.

शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. दिल्ली-कोलकाता महामार्गावरील ढाब्याजवळ चहा पिण्यासाठी थांबलेल्या मजुरांनी भरलेल्या ट्रक आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली. या अपघातात 24 जणांनी आपला जीव गमावला.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 17, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या