राजगुरुनगर, 22 मे : पुणे-नाशिक महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाने राजगुरुनगर येथील धनश्री चौकात तरुणाला चिरडल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची सायंकाळपर्यत ओळख पटलेली नाही.
सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूक बंद असताना नागरिक मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहेत. अशात राजगुरुनगर येथून पुण्याकडे जाणासाठी प्रवाशी तरुण पुणे-नाशिक महामार्गावर उभा असताना त्याने नाशिकवरुन येणाऱ्या ट्रकला हात केला. मात्र त्यावेळी ट्रक चालकाने प्रवाशांच्या अंगावर ट्रक घातला. त्यावेळी सर्वांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र एका तरुणाच्या अंगावरुन ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे.
नाशिकच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालक प्रवाशाला चिरडून पळून जात असताना राजगुरुनगर येथील तरुणांनी चांडोली येथे अडवलं. त्यानंतर जमावाने अपघाताचा राग व्यक्त करत ट्रकवर दगडफेक केली.
हेही वाचा -पुण्यातील शुक्रवार पेठेत घडली भयंकर घटना, मृतदेह 3 तास रस्त्यावरच पडून
दरम्यान, राजगुरुनगर पोलीस स्थानकातील पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ट्रक व ट्रक चालकासह क्लिनरला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी दिली आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.