• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक, 3 जण जागीच ठार

पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक, 3 जण जागीच ठार

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ जवळील धनगर वाडी इथं हा अपघात झाला.

 • Share this:
  सातारा, 04 ॲागस्ट : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ( accident on Pune-Bangalore highway) शिरवळ जवळ 6 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ जवळील धनगर वाडी इथं हा अपघात झाला. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनॅार कारला धडक दिल्याने कार मधील तीन जण जागीच ठार झाले आहेत तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला. अक्षरश: कारचा भाग कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. यादरम्यानच अपघातग्रस्त ट्रकने दुधाचा टँकर, मालवाहतूक ट्रक तसेच स्कॉर्पिओसह आणखी एक वाहन अशा पाच वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात स्थळावर शिरवळ आणि खंडाळा पोलीस पोहोचले असून ट्रॅक्टरच्या मदतीने चक्काचूर झालेल्या मारुती वॅगनॅार कारमधील मृतदेह काढण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून मदतकार्य सुरू आहे.
  Published by:sachin Salve
  First published: