मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, 50 फूट दरीत कोसळली खासगी बस

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, 50 फूट दरीत कोसळली खासगी बस

बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना, अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू, 35 जखमी.

  • Share this:

खंडाळा, 04 नोव्हेंबर: दोन वेगवेगळ्या अपघातमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दुर्घटना घडली आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा गारमाळ इथे भरधाव खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र वळणावरून बस 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा कराड इथून ही खाजगी बस मुंबईकडे जात असताना दुर्घटना घडली. अपघातामध्ये बसमधील सीट तुटल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले तर चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखींमध्ये दोन महिला एक पुरुष तर एक दोन वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. अपघातानंतर 30 ते 35 जखमींना तळेगाव, निगडी, पनवेल, तसेच खोपोली येथील विविध रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दुचाकी आणि भरधाव कारची धडक, एकाचा मृत्यू 4 जखमी

अमरावती ते पांढुरणा रस्त्यावर भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात 3 पुरुष आणि 1 महिला गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वेगाने गाड्या जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

राज्यपालांना भेटण्यामागचं संजय राऊत यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 10:26 AM IST

ताज्या बातम्या