मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात, 30 फूट खोल खाईत कोसळली 3 वाहनं

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात, 30 फूट खोल खाईत कोसळली 3 वाहनं

एका पाठोपाठ तीन वाहनं 30 फूट खोल खाईत कोसळली

एका पाठोपाठ तीन वाहनं 30 फूट खोल खाईत कोसळली

एका पाठोपाठ तीन वाहनं 30 फूट खोल खाईत कोसळली

भिवंडी, 14 डिसेंबर: मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik highway) भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पिंपळास फाट्याजवळ विचित्र अपघात (Road Accident) झाला आहे. एका पाठोपाठ तीन वाहनं 30 फूट खोल खाईत कोसळली आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मिळालेली माहिती अशी की, सध्या मुंबईसह परिसरात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. त्यात काही भागात बेमोसमी पाऊसही सुरू आहे. हेही वाचा...प्राध्यापिकेला भररस्त्यावर जाळल्यानं हादरला होता महाराष्ट्र, नेमकं काय घडलं? भिवंडीपासून जवळच असलेल्या पिंपळास फाट्याजवळ पावसामुळे रोड निसरडा झाल्यानं एका वाहन चालकानं अचानक वाहनाचा ब्रेक दाबला. त्यामुळे मागे असलेला भंगार भरलेला ट्रक थेट 30 फूट खोल खाईत कोसळला. त्यापाठोपाठ एचपी गॅसचा टँकर देखील त्याच खाईत कोसळला. नंतर एक कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. एका तासाच्या अंतरानं असा तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला रविवारी (13 डिसेंबर) रात्री अपघात झाला. आमदार कथोरे यांचे वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत, तर दुचाकीवरील दोन जण गंभीर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील एक जण अत्यवस्थ असल्याचं समजतं. हेही वाचा...'राज्यपालांना सांगा आमदारांची यादी मंजूर करा', मुनगंटीवार-परब यांच्यात खडाजंगी मिळालेली माहिती अशी की, आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून बदलापूरच्या दिशेने येत होते. त्यांचं वाहन दहागांव वाहुली गावाजवळ आलं असता वाहनाला एक भरधाव दुचाकी येवून धडकली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या गाडीला अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
First published:

Tags: Road accident

पुढील बातम्या