...नाहीतर 1 हजार फूट दरीत कोसळली असती बस, 40 मजुरांना घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात 

...नाहीतर 1 हजार फूट दरीत कोसळली असती बस, 40 मजुरांना घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात 

नेपाळचे असलेले हे मजूर लॉकडाऊनमध्ये अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावाकडे परत जायचं होतं. त्यासाठी बसने ते निघाले होते.

  • Share this:

रत्नागिरी 31 मे: रत्नागिरी येथून नेपाळ ला ४० मजुरांना घेऊन  जाणाऱ्या खासगी अराम बस ला मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात झाला. एका अवघड वळणावर ही आरामबस संरक्षण कठडा तोडून पलटी झाली. या बस मध्ये ऐकून ४० प्रवासी होते. त्यात महिला आणि मुलांचाही समावेश होता. एका कठड्याला बस अडकल्याने बस खोल दरीत जाण्यापासून वाचली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

संरक्षण कठडा मजबूत असल्याने दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हजार फूट खोल दरीत ही बस कोसळतांना वाचली.रविवारी रात्री सडे दहा वाजता हा अपघात झाला. लॉकडाऊनमध्ये हे सर्व मजूर अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावाकडे परत जायचं होतं. प्रत्येकी सात हजार रुपये देऊन आणि पोलीस परवानगी घेऊन ही बस नेपाळला दीर्घ प्रवासासाठी निघाली होती.

मात्र निघाल्यानंतर काही तासांमध्येच हा अपघात झाला. काही प्रवाशी  किरकोळ जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते चौकशी करत आहेत.

 

 

 

First published: May 31, 2020, 11:56 PM IST
Tags: accident

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading