रत्नागिरी, 6 मार्च : मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात आंबा पॉईंट येथे लाद्यांनी भरलेला टेम्पो उलटला (Accident On Mumbai Goa Highway) आहे. या दुर्घटनेत टेम्पोच्या हौदात बसलेला बन्सीलाल कुमावत हा कामगार ठार झाला असून मुकेश कुमरा व राजेश कौंडर हे दोन कामगार जखमी झाले आहेत.
नांदेड येथील राहणारा सुधाकर भगमोरे हा आयरिश टेम्पोमध्ये लाद्या भरून पनवेल येथून गुहागरकडे येत होता. मात्र वाटेत मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आंबा पॉईंट येथे त्याचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने वळणावर टेम्पो उलटला. टेम्पोच्या हौदात लाद्यांवर बसलेल्या तीन कामगारांपैकी बन्सीलाल चुनीलाल कुमावत (50,पनवेल) यांच्या अंगावर लाद्या पडल्याने ते त्याखाली अडकले. यातच त्यांच्या मृत्यू झाला.
हेही वाचा - पुन्हा कोरोनाचा धोका? महाराष्ट्रातील प्रवाशांवर शेजारील राज्याने लावले निर्बंध
दुसरीकडे, या अपघातात मुकेश कुमावत आणि चालक सुधाकर भगमोरे हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत टेम्पोचालक सुधाकर भगमोरे याच्याविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratnagiri, Road accident