भीषण अपघात! कार डिव्हायडरला धडकून थेट राँग साईडला जाऊन पलटली, एकाचा मृत्यू

भीषण अपघात! कार डिव्हायडरला धडकून थेट राँग साईडला जाऊन पलटली, एकाचा मृत्यू

गाडी डिव्हाडरला धडकून राँगल साईडला जाऊन पलटल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 6 ऑगस्ट : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आपतगाव येथील पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हाडरला धडकून राँगल साईडला जाऊन पलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

कारमधून एकूण तीन जण प्रवास करत होते. गाडी पलटल्यानंतर यातील एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला लगेच स्थानिकांच्या मदतीने चित्तेपिपंळगाव येथील पवार दवाखान्याच्या रुग्णवाहिकेतून औरंगाबादला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मूत्यू झाल्याची घटना सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली.

कारमधून प्रवास करणारे दोघेही जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा, दाम्पत्याला धडक देऊन कार उलटली नाल्यात, दोघांचा जागीच मृत्यू

दरम्यान, गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट झाला होता. साहजिकच अपघातांच्या घटनांमध्येही मोठी घसरण झाली. मात्र त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. बुधवारी चंद्रपुरात भीषण अपघात झाला होता. मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या पती-पत्नी भरधाव कारची धडक बसून दोघेही जागीच ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली.

Published by: Akshay Shitole
First published: August 6, 2020, 8:27 PM IST

ताज्या बातम्या