कंटेनर आणि दुधाच्या टँकरची जोरदार धडक,आगीत होरपळले तीन जण

कंटेनर आणि दुधाच्या टँकरची जोरदार धडक,आगीत होरपळले तीन जण

बुधवारी रात्री उशिरा देखील भीषण अपघात झाला होता. सांताक्रूझ लिंक रोडवर बसने 3 गाड्यांनी दिली जोरदार धडक दिली.

  • Share this:

धुळे, 22 ऑक्टोबर: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-धुळे आग्रा महामार्गावर नगावबारी जवळ भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव दुधाच्या टँकरनं धडक दिली आहे. महामार्गावर बिघडलेल्या अवस्थेत कंटेनर उभा असताना अचानक मागून आलेल्या भरधाव दुधाच्या टँकरनं जोराची धडक दिली. त्यानंतर दुधाच्या टँकरनं पेट घेतला आणि ही आग वाढत गेली.

अपघाताची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पाहाणी केली. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत कंटेनरमधील एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता तर दुधाच्या टँकरमधील दोन जण गंभीर भाजले आहेत. ही घटना धुळे-मुंबई आग्रा महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडली आहे.

हे वाचा-वैष्णो देवीला निघाल्या सायकलस्वार आजी; VIDEO पाहून म्हणाला, जय माता दी!

बुधवारी रात्री उशिरा देखील भीषण अपघात झाला होता. सांताक्रूझ लिंक रोडवर बसने 3 गाड्यांनी दिली जोरदार धडक दिली. मुंबईतील चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर बसने रात्री 5 वाहनांना धडक दिली. या अपघातात एक वाहनचालक गंभीर जखमी झाला असून 3 वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. चेंबूर सांताक्रूझ लिंक रोडवर एक दुचाकीस्वार पुलावर जाऊन संरक्षक कठड्यावर धडकला. यामुळे येणारी वाहने या मोटारसायकल स्वाराला मदत करण्यासाठी थांबली, मात्र त्याचवेळी मागून वेगात येणाऱ्या बसने 3 कारला जोरदार धडक दिली.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 22, 2020, 8:34 AM IST
Tags:

ताज्या बातम्या