Home /News /maharashtra /

पुण्याच्या दिशेने येणाऱ्या माजी अर्थमंत्र्यांच्या बहीण-भावोजीच्या गाडीला अपघात; दोघांचाही मृत्यू

पुण्याच्या दिशेने येणाऱ्या माजी अर्थमंत्र्यांच्या बहीण-भावोजीच्या गाडीला अपघात; दोघांचाही मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चुराडा झाला आहे

    बीड, 24 फेब्रुवारी : माजी अर्थमंत्री आणि भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भाऊजी यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या दिशेने जात असताना भरधाव कार पुलाखाली गेल्याने हा भीषण अपघात झाला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरीजवळ सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहीण आणि भाऊजी जागीच ठार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Accident in the car of the sister and brother in law of the former finance minister sudhir mungantiwar ) बीड जिल्ह्यातील कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरुन ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र भरधाव वेगाने गाडी पुलाच्या खाली गेल्याने हा अपघात घडला. यामध्ये ममता तगडपल्लेवार आणि भाऊजी विलास तगडपल्लेवार या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. हे ही वाचा-8807 रुग्ण, 80 मृत्यू; 2021 मधली महाराष्ट्राची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी बातमी अपडेट होत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Road accident

    पुढील बातम्या