सातारा, 4 जानेवारी : साताऱ्यात वाई- पाचवड रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिन्याची गर्भवती महिला गंभीर जखमी झाली असून तिचा पतीही जखमी झाला आहे.
साताऱ्यातील वाई-पाचवड रोडवर भरधाव वेगाने वाईकडे जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही घटना पाठमागून येणाऱ्या कारमधील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात दुचाकीवरील चालक प्रवीण आणि चार महिन्याची गर्भवती महिला वनिता भोसले हे पती-पत्नी जखमी झाले असून कार चालक राजेंद्र रामचंद्र रसाळ याच्यावर वाई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात जखमी झालेल्या पती पत्नीला नागरिकांनी तत्काळ उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा भीषण अपघात मागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात कैद झाला. यामध्ये कारचालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचं दिसत आहे. एकमार्गी रस्त्यावर कारचालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली आहे. त्यामुळे सदर कारचालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.