अंत्ययात्रा जात असतानाच पूल कोसळला, मृतदेहासह 25 जण नदीत पडले

अंत्ययात्रा जात असतानाच पूल कोसळला, मृतदेहासह 25 जण नदीत पडले

  • Share this:

सातारा, 30 डिसेंबर : महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावात रविवारी दुःख घटना घडली. गावाच्या मंदिराजवळील लोखंडी पूलावरून अंत्ययात्रा जात असताना लोखंडी पूल कोसळला. यामध्ये मृतदेहासह 25 जण  नदीत पडले. जखमींना तात्काळ जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मदतीला आलेल्या गावकऱ्यांनी नंतर जखमींना बाहेर काढून अंत्यसंस्कार पार पाडले.

खरोशी गावातल्या सर्वात ज्येष्ठ नागरिक 90 वर्षांच्या कृष्णाबाई चांगू कदम यांचं शनिवारी रात्री निधन झालं. रविवारी सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली गावाच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीकडे जाताना नदी ओलांडू जावं लागतं. नदी ओलांडण्यासाठी एक लोखंडी पूल आहे. अंत्ययात्रा पूलावर आली असतानाच अचानक पूल कोसळला.

या अकस्मिक घटनेनं खांदेकरी आणि इतर काही लोक 25 फुट नदीत पडले. नदी कोरडी असल्यानं सर्वांना दगडांचा मार बसला. जवळपास असेल्या लोकांनी गावात ही माहिती दिली आणि लोक मदतीला धावून आले.

त्यांनी जखमींना सरकारी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केलं आणि मृतदेह पुन्हा खांद्यावर घेऊन अंत्यसंस्कार पार पाडले. हा पूल 25 वर्ष जुना असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. गेली अनेक वर्ष इथे नवा पूर उभारण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र प्रशासनाने लक्ष दिलं नाही. आतातरी या नदीवर नवा पूल उभारा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

 

First published: December 30, 2018, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading