शिवजयंतीच्या निमित्ताने ज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, १२ जखमी

शिवजयंतीच्या निमित्ताने ज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, १२ जखमी

कोल्हापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरून सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. आणि यामध्ये 5 जण ठार झालेत.

  • Share this:

19 फेब्रुवारी : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाला आहे. आणि या महाविद्यालयीन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आजच्या शिवजयंतीच्याच दिवशी काळानं शिवप्रेमीवर घाला घातला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरून सांगलीला शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. आणि यामध्ये 5 जण ठार झालेत. आज पहाटे पाच वाजता हा अपघात घडला असून यामध्ये 12 जण जखमी झालेत.

सांगली शहरातून शिवजयंती साजरी करण्यासाठी काल रात्री पन्हाळगडावर हे तरुण आले होते, त्यानंतर आज पहाटे पन्हाळगडावरून सांगलीला शिवज्योत घेऊन जात असताना या गाडीला अपघात झाला. या अपघातात जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून 12 पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. शिवजयंतीच्याच दिवशी असा दुर्देवी अपघात झाल्यानं शिवप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

पण हा टेम्पो नेमकं कशामुळे पलटी झाला, अपघात कशामुळे झाला याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. अपघातानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली असून पोलिसही घटनास्थळी दाखल झालेत.

First published: February 19, 2018, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading