मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अतिवेगाचा बळी, 180च्या स्पीडचं लाईव्ह करताना अपघात, तरुणाचा मृत्यू

अतिवेगाचा बळी, 180च्या स्पीडचं लाईव्ह करताना अपघात, तरुणाचा मृत्यू

अपघातात 20 वर्षीय तरुण शिवम जाधवचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचाच आतेभाऊ ऋषिकेश पवार गंभीर जखमी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा अपघात झालाय.

  चिंचवड, 14 मे : बातमी आहे अति वेगाच्या बळीची. भरधाव वेगातील कार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात 20 वर्षीय तरुण शिवम जाधवचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचाच आतेभाऊ ऋषिकेश पवार  गंभीर जखमी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा अपघात झालाय.

  आजच्या तरुणाईला वेगाचं प्रचंड आकर्षण आहे. मात्र या अती वेगाच्या प्रेमानं पिंपरी चिंचवडमधील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. ताशी 180पेक्षा अधिक वेगाने कार चालवत त्याचं live करणारा हा 20 वर्षीय तरुण शिवम् जाधवचा या अपघातात मृत्यू झालाय. स्पीड live करण्याच्या नादात शिवमचा गाडीवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला.  अपघातग्रस्त गाडीची अवस्था बघून आपल्या लक्षात येऊ शकतं की गाडीचा किती वेग असेल.

  या अपघाता दरम्यान शिवमच्या मोबाइलवरून live करणारा त्याचा आतेभाऊही गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.. पिंपरी चिंचवड शहरातील ग्रेड सेप्रेटर मार्गावर काल सकाळी हा अपघात घडला होता. शिवम हा त्याच्या घरच्यांचा एकुलता एक मुलगा होता, त्याच्या अशा अपघाती निधनाने  शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

  First published:

  Tags: Speed news, अपघात, मृत्यू