Home /News /maharashtra /

धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या सिस्टीममधून विधी शाखेचा पेपर गायब, ABVPच 'पुंगी वाजवा'

धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या सिस्टीममधून विधी शाखेचा पेपर गायब, ABVPच 'पुंगी वाजवा'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

पुणे, 29 ऑक्टोबर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठाच्या सिस्टीममधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी (ABVP)संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुंगी वाजवा आंदोलन केलं. कुलगुरुंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांना बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा..cyber Fraud: बँक खात्यावर चोरट्यांचा डल्ला; टेन्शन घेऊ नका, असे परत मिळतील पैसे कोरोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं पार पडत आहेत. परंतु यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे 14 हजारांहून अधिक तक्रारी उपलब्ध झाल्या असून त्यावर काय उपाययोजना करणार, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेलं नाही. बीए एलएलबी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठपूर्वी देण्यात येणारी बीएची पदवी मिळणार नाही, असे सांगण्यात आहे. तसेच इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल, असं प्रशासन सांगत आहे. परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे? असा सवाल ABVPनं उपस्थित केला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध ABVPच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'पुंगी वाजवा' आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत कुलगुरु स्वतः येऊन दखल घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा पवित्रा ABVPच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुलगुरूना घातला घेराव... दरम्यान, ABVPच्या आंदोलक कार्यकर्त्यांना भेटायला आलेल्या कुलगुरु उमराणी यांना घेराव घालण्यात आला. एवढच नाही तर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना प्रकृती स्वास्थ्य, एकाच वेळी दोन परीक्षा, तांत्रिक अडचण अशा कारणास्तव परीक्षेला बसता आले नाही, तर त्यांच्यासाठी नजिकच्या कालावधीमध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. हेही वाचा..मुंबईत रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान, नाहीतर होऊ शकतो जबर दंड विशेष म्हणजे परीक्षेबाबतची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या