EXIT POLL 2019 : नागपुरात नितीन गडकरी जिंकणार की पडणार? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

EXIT POLL 2019 : नागपुरात नितीन गडकरी जिंकणार की पडणार? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

लोकसभा निवडणूक 2019मध्ये नागपुरात गुरू विरुद्ध शिष्यमधील लढत रंगतदार ठरली.

  • Share this:

मुंबई, 20 मे : लोकसभा निवडणूक 2019मध्ये नागपुरात गुरू विरुद्ध शिष्यमधील लढत रंगतदार ठरली. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्या लढतीमुळे ही निवडणूक खूपच गाजली. आता निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबतचे अंदाज आता एक्झिट पोलद्वारे समोर येऊ लागले आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरी भाजपचा गड राखण्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज ABP आणि Nielsen यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

वाचा ग्राउंड रिपोर्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसने नाना पटोलेंना उमेदवारी देऊन भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं. माजी खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडवी टीका करून भाजपची साथ सोडली आणि 2018 मध्येच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आधी भंडारा - गोंदियाचे भाजपचे खासदार असलेल्या नाना पटोलेंनी काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली.

वाचा :EXIT POLL : पार्थ पवारांचं काय होणार? मावळचं भवितव्य सांगतोय 'हा' निकाल

नागपूर मेट्रोचा मुद्दा

नाना पटोले हे नागपूरच्या मतदारांसाठी बाहेरचे उमेदवार असले तरी नितीन गडकरींना त्यांनी चांगलीच लढत दिली. नागपूरमध्ये 22 लाख मतदार आहेत. यामध्ये दलित, मुस्लीम, कुणबी समुदायाची संख्या 12 लाख आहे. नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय मंत्रालयाचा कारभार असल्यामुळे त्यांनी नागपूरमध्ये केलेली विकासकामं, नागपूर मेट्रोचा प्रकल्प हे निवडणुकीतले मुद्दे बनवले होते.

वाचा :EXIT POLL 2019 : सुप्रिया सुळे गड राखणार की फडणवीसांची इच्छा होणार पूर्ण?

स्वतंत्र विदर्भ आंदोलन 

नाना पटोले हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. पटोले हे स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे समर्थक मानले जातात. नाना पटोले हे लोकसभेच्या रिंगणात असूनही या निवडणुकीत नितीन गडकरी हेच केंद्रस्थानी राहिले.

आधी काँग्रेसचं वर्चस्व

नागपूर हे संघाचं मुख्यालय असूनही आधी इथे काँग्रेसचंच वर्चस्व होतं. 2014 च्या निवडणुकीत मात्र नितीन गडकरींनी काँग्रेसच्या बालेकिल्ला भेदत विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला. त्याआधी विलास मुत्तेमवार चार वेळा खासदार होते. नितीन गडकरींचा विजय हा काँग्रेसला मोठा धक्का होता.

हाय प्रोफाइल मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस निवडून आले. त्यामुळेच नागपूर लोकसभा मतदारसंघ आणि सगळ्या विधानसभा मतदारसंघांत भाजपचं वर्चस्व आहे.

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत

First published: May 20, 2019, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading