EXIT POLL : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांचे सगळ्यात धक्कादायक निकाल

EXIT POLL : महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकांचे सगळ्यात धक्कादायक निकाल

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला NDA बहुमत मिळेल असं एक्झिट पोल सांगत असले, तरी राज्याच्या निकालाबाबत एक्झिट पोल्समध्ये एकवाक्यता नाही. हे आहेत Abp आणि Nielsen यांनी केलेल्या सर्व्हेमधले धक्कादायक निकाल..

  • Share this:

मुंबई, 20 मे : मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. बहुतेक सर्व एक्झिट पोलमधून (Poll of Polls) केंद्रात मोदी सरकार येणार असाच कौल दिसतो आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला NDA बहुमत मिळेल असं एक्झिट पोल सांगत असले, तरी राज्याच्या निकालाबाबत एक्झिट पोल्समध्ये एकवाक्यता नाही.  Abp आणि Nielsen यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात मतदारसंघानुसार निकालाचे अंदाज बांधण्यात आले आहेत.

मावळ मतदारसंघाचा एक्झिट पोलचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं उत्सुकतेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू पार्थ पवारच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभेची लढत यावेळी खूपच गाजली. इथे पार्थ पवार यांची लढत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्याशी होती. ही लढत पार्थ पवार यांनी जिंकली असल्याचा अंदाज एबीपी- निल्सन यांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

EXIT POLL : पार्थ पवारांचं काय होणार? मावळचं भवितव्य सांगतोय 'हा' निकाल

भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. एबीपी आणि नेल्सन यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांची चंद्रपूरमधली जागा धोक्यात आहे.

भाजपने सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. पण कोण जिंकतंय तिथून?

EXIT POLL 2019 : सुप्रिया सुळे गड राखणार की फडणवीसांची इच्छा होणार पूर्ण?

लोकसभा निवडणूक 2019मध्ये नागपुरात गुरू विरुद्ध शिष्यमधील लढत रंगतदार ठरली. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्या लढतीमुळे ही निवडणूक खूपच गाजली. आता निवडणुकीत कोण बाजी मारणार?

EXIT POLL 2019 : नागपुरात नितीन गडकरी जिंकणार की पडणार? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

राज्यातलं सर्वांचं लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं काय होणार? शिवसेनेने यावेळी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी दिली होती.

अशोक चव्हाण नांदेडचा गड राखणार, युतीला धक्का

मुंबईतला सर्वांत धक्कादायक निकाल असू शकतो ती जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबईची. पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त असा सामना या मतदारसंघात होता.

EXIT POLL 2019 : उत्तर मध्य मुंबईतून महाजनांना धक्का, प्रिया दत्त यांना लाॅटरी?

2014मध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर रिंगणात आहे. काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज?

EXIT POLL 2019 : 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर मुंबईतून दिल्लीत जाणार की नाही?

First published: May 20, 2019, 7:06 PM IST

ताज्या बातम्या