परळीत तब्बल 4 हजार झाडाची कत्तल, राखेच्या चोरीसाठी झाडांचा बळी

परळीत तब्बल 4 हजार झाडाची कत्तल, राखेच्या चोरीसाठी झाडांचा बळी

परळी औष्णिक विद्दुत केंद्रात 40 एकर क्षेत्र हे राख डंप करण्यासाठी वापले जाते या परिसराला "राख बंदारा परिसर " या नावाने ओळखले जाते.

  • Share this:

परळी, 11 फेब्रुवारी : एकीकडे झाडे लावा झाडे जगावा हा नारा दिला जात असताना दुसरीकडे परळी येथे तब्बल 4 हजार झाडाची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करताना वृक्षतोड थांबवणे सरकार समोरील आव्हान आहे. यामुळे परळी शहरात राखेमुळे प्रदूषणाच्या समस्येनं डोकेवर काढलं आहे. नागरिकांना गंभीर श्वसनाचे आजार, होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

परळी औष्णिक विद्दुत केंद्रात 40 एकर क्षेत्र हे राख डंप करण्यासाठी वापले जाते या परिसराला "राख बंदारा परिसर " या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून राखेवर झाडे येऊ शकतील का? असा भारतातला पहिला प्रयोग केला गेला होता. तो यशस्वी झाल्यानंतर तब्बल 4 हजार झाडे लावण्यात आली होती. ती झाडे चांगली जोपासली म्हणून 2006/7 मध्ये फिनिक्स गार्डनला पुरस्कृत देवून सन्मानित केले होते. अगदी सुस्थितीत 15 ते 20 वर्षांची झाडे डोलाने बहरत होती.

मात्र, यावर्षी फिनिक्स गार्डनची सध्या अवैधरित्या कत्तल करण्याचे काम सुरू आहे. राखेची वाहतूक करणाऱ्यांनी अक्षरशः या गार्डनची दुरावस्था झाली आहे. 15 ते 20 वर्षांची झाडे तोडून मोडून टाकली. त्यावरून राखेची वाहतूक सुरू यामुळे झाडांची कत्तल सुरूच आहे. या बाबतीत परळी येथील औष्णिक विद्दूत केंद्राचे मुख्य अभियंता यांना विचारलं असता बोलण्यास नकार दिला. राखेच्या ठिकाणावरून अवैधरित्या राख चोरली जात असल्याची फिर्याद दिली असल्याचं सांगितलं.

प्रतिबंध क्षेत्रात असलेल्या फिनिक्स गार्डनच्या झाडांची दिवसा ढवळ्या अशी कत्तल होत असून झाडा खालची राख अवैधरित्या शेकडो टिप्परने चोरली जात आहे. मात्र, औष्णिक विद्युत केंद मुख्य अभियंता हे मूग गिळून गप्प? असा प्रश्न उपस्थित स्थानिक नागरिक विचारतात आहेत मात्र बोलण्यास घाबरत आहे. उद्या राख चोरणारे त्रास देतील म्हणून दहशत आहे. राख चोरी राजकीय पुढाऱ्यांची नावे सांगतात. शेवटी नाव न सांगण्याच्या अटीवर दोघांनी प्रतिक्रिया दिल्या.

परळीकराच्या आरोग्य आणि पर्यावरणाच्या हानी संदर्भात सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे लक्ष देणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

First published: February 11, 2020, 11:43 PM IST

ताज्या बातम्या