अभिजीत बिचुकलेचा उदयनराजेंना टोला, शरद पवारांनीही दिलं आव्हान

बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी आता उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2019 08:17 PM IST

अभिजीत बिचुकलेचा उदयनराजेंना टोला, शरद पवारांनीही दिलं आव्हान

पुणे, 25 सप्टेंबर : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले याने आता उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उदयनराजे नेमकं काय बोलता हे कळत नाही, खासदारकी सोडून भाजपात गेला हे चुकीचं केलं, अशी खंतच बिचुकलेनं बोलून दाखवली.

अखिल बहुजन समाज सेनेचे नेते अभिजीत बिचकुले याने आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढणार अशी घोषणा केली.

यावेळी बिचुकले याने उदनराजेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. उदयनराजे हे छत्रपतीचे वंशज आहे त्यांनी हातातली खासदरकी न सोडता जनतेसाठी काम करायला हवे होते, असं बिचकुले म्हणाले.

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार उभे राहिले तर निवडणूक लढवणार का? असा सवाल केला असता, पवार यांना निवडणुकीत आव्हान देणे हे भल्याभल्यांना जमले नाही. पण साहेब जर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर त्यांच्याविरोधात उभं राहणे हे माझ्यासाठी गौरवास्पद राहील, अशी घोषणाच अभिजीत बिचकुलेनं केली.

अखिल बहुजन पक्ष हा 288 विधानसभेच्या राज्यातील जागा लढवणार असून बिग बाॅसच्या माध्यमातून मी घराघरात पोहचलो आहे. तसंच मी आजपर्यंत वंचितासाठी काम केले असून नागरिक आमच्या पक्षाला न्याय देतील, असा विश्वासही त्याने बोलून दाखवला.

Loading...

कोण आहे बिचकुले?

अवघ्या सातारा मुलखात कवीमनाचे नेते म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या AB अर्थात अभिजित बिचुकले. डॅशिंग अशा खासदार उदयनराजेंना अभिजित बिचकुलेंची भीती वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी आजवर भल्याभल्यांना दिलेलं आव्हान. लोकशाहीतली अशी कोणतीच निवडणूक नाही जिथे बिचकुलेंनी फॉर्म भरला नाही. नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीसुद्धा त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. प्रसंगी मोदींनाही साकडं घातलं.

बिचकुलेंना कुठल्या निवडणुकीत यश आलं नाही हा भाग वेगळा. पण त्यांचे प्रयत्न थांबले नाहीत. आता तर त्यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे. या पठ्ठ््यानं या आधीही उदयनराजेना आव्हान दिलं होतं.

बिचकुले फक्त निवडणुकाच लढवत नाहीत. तर कवी मनाच्या अभिजित यांनी गायनातही हात मारून पाहिला. स्वत:वरच्या त्यांच्या भन्नाट अल्बमने साताऱ्यात धुमाकूळ घातला होता. अलीकडे बिग बॉस सिझन 2 मध्ये सहभागी झाला होता. बिग बॉसच्या घरात बिचकुलेनं अनेक वाद ओढावून घेतले होते. त्यामुळे बिचकुलेची चांगलीच चर्चाही झाली होती. खुद्द सलमान खाननेच त्याचं कौतुक केलं होतं.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2019 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...