मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'महिलांना एसटी तिकीटात 50 टक्के सूट दिलीत, आता...', बिचुकलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'महिलांना एसटी तिकीटात 50 टक्के सूट दिलीत, आता...', बिचुकलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अभिजीत बिचुकलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अभिजीत बिचुकलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना 50 टक्के सूट दिल्याच्या निर्णयावर अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढच नाही तर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सचिन जाधव, प्रतिनिधी

सातारा, 24 मार्च : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले कायमच चर्चेमध्ये असतो. मग निवडणुकांमध्ये उभं राहणं असो किंवा राजकीय मत मांडणं, बिचुकलेंची वक्तव्य सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. आता एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना 50 टक्के सूट दिल्याच्या निर्णयावर अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढच नाही तर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

'महिला वर्गाला एसटी बसच्या प्रवासासाठी 50 टक्के सवलत दिली, त्याबाबत सरकारचं अभिनंदन करतो, मात्र महिला वर्गाची खरी गरज असणाऱ्या सिलेंडरला 1200 रुपये द्यावे लागतात, याबाबात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असून ताबडतोब सिलेंडरवर 50 टक्के सबसिडी द्यावी', असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

'महाराष्ट्राची पुढची मुख्यमंत्री महिला असेल, ही भूमिका मी मांडली होती, मात्र आता माझी कॉपी इतर लोक करायला लागले आहेत. मी बैल आहे, माझी कॉपी कुणी करू नये. बेडकाने बैल व्हायचं पाहू नये,' असा टोला अभिजीत बिचुकले यांनी लगावला आहे.

काहीच दिवसांपूर्वी झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले अपक्ष उभे राहिले होते. या निवडणुकीत बिचुकले यांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यांना एकूण 47 मतं मिळाली.

आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या पण सगळ्यात अपयशी

अभिजित बिचुकले यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र एकाही निवडणुकीत त्यांना यश मिळालेलं नाही. पण निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीने ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

'महाराष्ट्राचा 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरविणार..!' अशा आशयाचे बॅनर साताऱ्यात पाहायाला मिळाले. त्यावर बिचुकले यांच्या अतिआत्मविश्वासाची खिल्ली उडवली गेली. सातारा पालिकेतील एक कर्मचारी, लोकसभा उमेदवारी ते 'बिग बॉस-२' पर्यंतचा त्यांचा प्रवास अनाकलनीय म्हणावा लागेल.

राष्ट्रपती पदासाठी चक्का पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

नगरसेवक ते खासदार निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राची अजूनही चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पदासाठी पत्र लिहून 'भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,' अशी विनंती केली होती. तर सांगली इथं पंतगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजित कदम यांच्या बिनविरोध निवडीपेक्षाही विरोधी उमेदवार म्हणून बिचुकलेंच्या माघारीचीच चर्चा सर्वाधिक झाली.

साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध तसंच वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरुद्धही अभिजित बिचुकले यांनी निवडणूक लढवली होती.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde