'आमदारांनो! आधार कार्ड घेऊन या, लवकरच होणार शपथविधी'

'आमदारांनो! आधार कार्ड घेऊन या, लवकरच होणार शपथविधी'

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कधी सुटणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. येत्या 4-5 दिवसांत आम्ही सरकार स्थापन करू असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे पक्षाचे आमदार अब्दुल सत्ता यांनी सांगितलं की, पक्षाच्या सर्व 56 आमदारांना मुंबईला बोलवण्यात आलं आहे. तसेच सत्ता स्थापनेचं चित्र शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असंही ते म्हणाले.

सत्तार म्हणाले की, सर्व आमदारांची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत. आम्हाला उद्धव ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढं आल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही पाठिंब्यासाठी अडचणी येण्याची शक्यता कमी आहे अशी चर्चा रंगली आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदारांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पाच दिवसांचे कपडे घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व आमदार मुंबईतच राहतील ते कुठेही जाणार नाहीत असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीनंतर बैठकांना पूर्णविराम मिळेल आणि येत्या 4 ते पाच दिवसांमध्ये राज्यात महाशिवआघाडीचं लोकप्रिय सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यात काल चर्चा झाली आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

'काँग्रेसमध्ये निर्णयाची एक प्रक्रिया आहे. उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात सरकार बनेल. डिसेंबरपर्यंत राज्यात मजबूत सरकार येईल. येत्या पाचसहा दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण होतील. आम्ही बहुमताचा आकडा राज्यपालांकडे घेऊन गेल्यावर आम्हाला राज्यस्थापनेची परवानगी मिळेल,' असं म्हणत संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबद्दल माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Nov 20, 2019 01:04 PM IST

ताज्या बातम्या