मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शासकीय कार्यालयात हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणायचं? अब्दुल सत्तारांनी दिलं उत्तर

राज्यातल्या शासकीय कार्यालयांमधले कर्मचारी आता फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) म्हणतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 ऑगस्ट : राज्यातल्या शासकीय कार्यालयांमधले कर्मचारी आता फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम (Vande Mataram) म्हणतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या या घोषणेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. रझा अकादमीने (Raza Academy) या निर्णयाला विरोध केला आहे. तर राज्य सरकारमधले मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांना मुनगंटीवार यांच्या या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. हॅलो चांगलं आहे, वंदे मातरमही चांगलं आहे आणि गुड मॉर्निंग आणि गुड नाईटही चांगलं आहे, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक मंत्री करण्यात आलं. सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना केल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या