मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अखेर 3 दिवसांनंतर 'पाहुणे' गेले, अजितदादांशी संबंधीत नंदुरबारमधील कारखान्यावर छापा सत्र थांबले!

अखेर 3 दिवसांनंतर 'पाहुणे' गेले, अजितदादांशी संबंधीत नंदुरबारमधील कारखान्यावर छापा सत्र थांबले!

नंदुरबारच्या समशेरपुर स्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर (aayan multitrade llp ) आयकर विभागाचे छापा टाकला होता. तब्बल तीन दिवशी ही कारवाई सुरू होती.

नंदुरबारच्या समशेरपुर स्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर (aayan multitrade llp ) आयकर विभागाचे छापा टाकला होता. तब्बल तीन दिवशी ही कारवाई सुरू होती.

नंदुरबारच्या समशेरपुर स्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर (aayan multitrade llp ) आयकर विभागाचे छापा टाकला होता. तब्बल तीन दिवशी ही कारवाई सुरू होती.

  • Published by:  sachin Salve

नंदुरबार, 09 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या मुलासह बहिणीच्या घरी आयकर विभागाने धाड (Income Tax Department) टाकली. नंदुरबारमधील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावरही (aayan Multitrade LLP Sugar Factory Nandurbar)  छापा टाकण्यात आला होता. तब्बल 70 तासानंतर आयकर विभागाचे पथक कारखान्या बाहेर आले आहे. 3 दिवसानंतर कारवाई संपुष्टात आली आहे.

नंदुरबारच्या समशेरपुर स्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाचे छापा टाकला होता. तब्बल तीन दिवशी ही कारवाई सुरू होती. तीन दिवसांपूर्वी या कारखान्यात दाखल झालेल्या आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून होते. कार्यालयातील कागदपत्रांसह संगणक आणि इतर गोष्टींची झाडाझडती घेत होते.

मुलाच्या एका चुकीमुळे बाप झाला कोट्यवधी; कुटुंबाला बसला आश्चर्याचा धक्का!

तब्बल तीन दिवस ही कारवाई सुरू होती. अखेर आज 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या कंपनीतून बाहेर पडल्या आहे.  नेमकं कारवाईत काय मिळालं याबाबत बोलण्यास मात्र नकार दिला आहे.

दरम्यान, या कारवाईबाबत आयाम मल्टीट्रेड आणि आयकर विभाग या दोघांनी अद्यापही संवाद साधलेला नाही. त्यामुळे बंद कार्यालयाच्या दरवाजातून नेमकी काय कारवाई केली जाते याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांना टोला

दरम्यान, 'आयकर विभागाने ज्या धाडी टाकले आहेत. त्या दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईबद्दल आयकर विभागाने 1,050 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे सापडल्याचे सांगितले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. माध्यमांनाही त्याच गांभीर्य अजून कळलेलं नाही. ही 1050 कोटींची दलाली बदल्यांसाठीची आहे, टेंडर साठीची आहे. असे देशात पहिल्यांदाच होत आहे' असंही फडणवीस म्हणाले.

ऑपरेशन कवचकुंडल आहे तरी काय? नगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्ण वाढले

काल ज्या पाच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्या कारखान्याच्या खरेदीसाठी राबवण्यात आलेली प्रक्रिया चूक असल्यामुळे ही कारवाई झाली. साखर कारखाना खरेदी करताना तुम्ही तो लाचेच्या किंवा काळ्या पैशाने त्याबद्दल फक्त टॅक्स भरून तो पांढरा पैसा आहे असं भासवून खरेदी करू शकत नाही. कारखाना खरेदी करताना तो योग्य पैशानेच खरेदी करावा लागतो. मात्र, या पाचही प्रकरणात तसं झालं नव्हतं. त्या प्रकारच्या तक्रारी होत्या आणि त्यानंतरच आयकर विभागाने कारवाई केली आहे, असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

'पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाई पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

First published: