मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नगरच्या पाथर्डीमध्ये आमिरचं 'तुफान', जलसंधारणाची कामं सुरू

नगरच्या पाथर्डीमध्ये आमिरचं 'तुफान', जलसंधारणाची कामं सुरू

४५ दिवस जोगेवाडी गावातली पुरुष मंडळी  जलसंधारणाच्या कामाच्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. त्यांची जेवणाची सोय गावातल्या महिला करणार आहेत.

11 एप्रिल : पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी इथं पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं सुरू आहेत. 'गाव बंद, श्रमदान कर' हा नारा देत सर्व गावातील मंडळी घराला कुलूप लावून  एकत्र येत श्रमदान केलं. अभिनेते अामिर खान आणि त्यांची पत्नी किरण राव या दोघांनीही हजर राहून  गावकऱ्यांचा उत्साह वाढवला . आमिर खाननं गावकऱ्यांशी संवादही साधला.

४५ दिवस जोगेवाडी गावातली पुरुष मंडळी  जलसंधारणाच्या कामाच्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. त्यांची जेवणाची सोय गावातल्या महिला करणार आहेत. गावातल्या महिला,पुरुष,विद्यार्थी,तरुणांपासून आबाल वृद्धांपर्यंत सगळीच गावकरी मंडळी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत  श्रमदान करत आहे.

या गावाची लोकसंख्या सुमारे दोन ते अडीच हजार इतकी आहे. यातील बहुतांशी  लोक ऊस तोडणीसाठी बाहेरगावी जातात. सध्या सुमारे ८०० ते ९०० लोक या ठिकाणी श्रमदानातून काम करत आहेत.

First published:

Tags: Aamir khan, Pani foundation, Pathardi, आमिर खान, किरण राव, पाथर्डी, पानी फाऊंडेशन