भगव्या फेट्यातल्या आदित्य ठाकरेंनी विधानसभेत असं घेतलं नाव

भगव्या फेट्यातल्या आदित्य ठाकरेंनी विधानसभेत असं घेतलं नाव

भगवा फेटा घातलेले आमदार आदित्य ठाकरे सभागृहामध्ये आकर्षणाचं केंद्र बनले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही विधानसभेत पहिल्यांदाच उपस्थिती होती.

  • Share this:

मुंबई, 30 नोव्हेंबर : विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं गेलं. हा विश्वासदर्शक ठराव महाविकास आघाडीने जिंकला. विधानसभेत भाजपने सभात्याग केल्यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांची शिरगणती घेण्यात आली. एकूण 169 आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.

यामध्ये आमदारांनी स्वत:चा परिचय करून दिला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी आपलं नाव 'आदित्य रश्मी उद्धव ठाकरे' असं घेतलं. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष त्यांच्याकडे गेलं. भगवा फेटा घातलेले आमदार आदित्य ठाकरे सभागृहामध्ये आकर्षणाचं केंद्र बनले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही विधानसभेत पहिल्यांदाच उपस्थिती होती. उद्धव ठाकरे सध्या विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. येत्या 6 महिन्यांत त्यांना यापैकी एका सभागृहातून निवडून यावं लागणार आहे.

गाजलेला फोटो

उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर रश्मी ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं तेव्हाचा फोटो खूपच गाजला होता. आदित्य ठाकरे या दोघांकडे कौतुकानं पाहत होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं आणि आदित्य ठाकरेंनी राजकारणात आपली छाप उमटवावी, अशी रश्मी ठाकरे यांची प्रबळ इच्छा होती, असं म्हणतात. त्यामुळे त्या उद्धव ठाकरेंची पत्नी आणि आदित्य ठाकरेंची आई अशी ओळख अभिमानाने मिरवतात. आता आदित्य ठाकरेंनीही त्यांचं नाव अभिमानाने घेतलं आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे

उद्धव ठाकरेंचा उल्लेख महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे असा केला. उद्धव ठाकरेंनीही याच नावाने शपथ घेतली. आता आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे नावही चांगलंच गाजणार आहे.आदित्य ठाकरेंची प्रेरणा घेऊन आता तरुणांमध्ये असं नाव घेण्याचा ट्रेंड येऊ शकतो.

(हेही वाचा : LIVE : ठाकरे सरकार पहिली परीक्षा पास, महाविकास आघाडीने सिद्ध केलं बहुमत)

आपल्याला जन्म देणाऱ्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीजणांनी आईचंही नाव घेण्याची प्रथा पाडली. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आईचं नाव आपल्या नावामध्ये घेतात. त्याचबरोबर काहीजण आडनाव न लावता आपल्या आईवडिलांचं आद्याक्षर वापरतात. आदित्य ठाकरेंनी मात्र याहीपुढे जाऊन आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, असं नाव घेतलं आहे. नावातं काय आहे,असं म्हटलं जातं. पण आपण ज्या पद्धतीने आपलं नाव घेतो ते कसलं महत्त्वाचं आहे हे आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं.

=============================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 03:18 PM IST

ताज्या बातम्या