आदित्य ठाकरेंची शिवसेनेत आता निर्णायक भूमिका राहणार!

आदित्य ठाकरेंची शिवसेनेत आता निर्णायक भूमिका राहणार!

आता लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची शिवसेनेत आता निर्णायक भूमिका राहणार आहे.

  • Share this:

मुंबई 18 फेब्रुवारी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर आज अखेर मोहोर उमटली. गेली काही महिने युती होणार की नाही याची चर्चा राज्यात आणि देशातही सुरू होती. महागठबंधन जोरात असताना युतीचं मात्र काही नक्की होत नव्हतं. जानेवारी महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. आजही मातोश्रीवर युतीच्या अंतिम बोलणीत जे मोजके नेते सहभागी होते त्यात आदित्य ठाकरे यांचा समावेश होता. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत आदित्य ठाकरे यांची भूमिका निर्णायक राहणार याचे स्पष्ट संकेत आहेत.

मुंबईत पोहोचल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नंतर भाजपच्या कोअर कमेटीची बैठक झाली. त्यानंतर सर्व नेते मंडळी मातोश्रीवर रवाना झाली. मातोश्रीत पोहोचल्यावर तळमजल्यावर ख्याली खुशाली विचारल्यावर मुख्यमंत्री आणि अमित शहा पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये चर्चेसाठी गेले. या चर्चेत शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.

एवढ्या महत्त्वाच्या चर्चेत आदित्य ठाकरेंना सहभागी करून घेणे याचा अर्थ त्यांना राजकीय प्रशिक्षण देणं हा तर आहेच त्याच बरोबर त्यांना महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतलं जाणार हाही आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य महाराष्ट्राच्या दुष्काळी दौऱ्यावरही गेले होते.

युतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेत्यांसोबत आदित्य ठाकरेंनाही जागा देण्यात आली होती. टेक्नोसॅव्ही आणि नवनीवन कल्पनांची आवड असणाऱ्या आदित्य यांचा राजकीय घटनांकडे बघण्याचा अॅप्रोच तरुण असल्याने थोडा वेगळा आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उद्धव ठाकरे यांना इनपूट्स पुरविण्याचं काम आदित्य करत असतात.

आता लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची शिवसेनेत आता निर्णायक भूमिका राहणार आहे.

काही मुद्द्यांवर मतभेद झाले पण 'युती पक्की', मुख्यमंत्र्यांची संपूर्ण PRESS CONFERENCE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading