'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं', शिवसेनेची नवी भूमिका?

'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं', शिवसेनेची नवी भूमिका?

आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या आधी सर्व जनतेला सांष्टांग दंडवत घातला. ते म्हणाले, जनता हीच माझ्यासाठी देव आहे. म्हणूनच मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय.

  • Share this:

जळगाव 18 जुलै : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला आज जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथून धडाक्यात सुरुवात झाली. आदित्य यांची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे दिग्गज नेते कसून तयारी करत आहेत. खुद्द खासदार संजय राऊत हे आदित्य यांच्यासोबत असून आदित्य यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे. आत्तापर्यंत संजय राऊत हे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं कायम सांगत होते. पहिल्यांदाज त्यांनी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे हा शिवसेनेच्या भूमिकेतला बदल आहे का अशी चर्चा होतेय.

सोलापूरमध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड? 'हे' 4 नेते युतीच्या वाटेवर

काय  म्हणाले संजय राऊत?

या वेळी झालेल्या जाहीर सभेत संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाची ही सुरुवात आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं. जिकडे आमदार आहेत तिकडे आशीर्वाद आहे आणि जिकडे नाहीय तिकडे आमदार करायला ही यात्रा आहे.

राष्ट्रवादीची 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून मान्यता जाणार? आयोगाची नोटीस

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या आधी सर्व जनतेला सांष्टांग दंडवत घातला. ते म्हणाले, जनता हीच माझ्यासाठी देव आहे. म्हणूनच मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी तुम्हाला नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेतोय. ही कुठल्याही पदासाठी यात्रा नाहीय. मला काही बनायचं म्हणून यात्रा नाहीये. मला महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी यात्रा आहे. नवीन महाराष्ट्र घडवायचा असेल तर सर्वांची मनं जिंकावी लागतील. अगदी विरोधकांचीसुद्धा. 'ही प्रचार यात्रा नाही तर तीर्थ यात्रा आहे. मी मतं मागायला आलेलो नाहीये. आदित्य ठाकरेंची ही यात्रा महाराष्ट्रभर जाणार असून 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्र महत्त्वाची समजली जाते.

First published: July 18, 2019, 4:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading