मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'समोर या, बसून बोलू', आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान

'समोर या, बसून बोलू', आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका केलीये. फक्त सही करुन आल्यावर कामं होतं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका केलीये. फक्त सही करुन आल्यावर कामं होतं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका केलीये. फक्त सही करुन आल्यावर कामं होतं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 24 जानेवारी : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका केलीये. फक्त सही करुन आल्यावर कामं होतं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ज्या कंपन्यांसोबत MOU करून आले त्या कंपन्या कुठल्या असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोला असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. जसं रस्ते, वेदांता आहे तसं याबाबत देखील मी आवाहन करतो की डावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोलूया, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

'अमुक अमुक मोठे नंबर दिले गेले, थोडा अधिक अभ्यास आपण केला तर कळेल. या ट्रीपचा अभ्यास केला तेव्हा कळालं की महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम होता, तो 4 दिवसांचा असायला हवा होता. 4 दिवसांसाठी 40 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 10 कोटी प्रत्येक दिवशी खर्च करण्यात आला. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टरचा उपयोग केला. जेव्हा चार्टर विमान घेतलं तेव्हा ते वेळेवर पोहोचायला घेता की उशीरा जायला?', असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

'16 तारखेला ते डावोसला पोहोचले. ज्या महत्त्वाच्या बैठका होत्या त्या रद्द झाल्या. एमआयडीसीचे सीईओ गेले होते का? अधिकृत कोण गेलं होतं? सगळा खर्च कसा झाला हे सगळ्यांसमोर यायला हवं. 17 तारखेला डावोसमध्ये तिथलं जे काँग्रेस आहे तिकडे बोलायला स्लॉट मिळाला. शाश्वत विकासावर त्यांनी भाषण केलं. मुंबईचा जोशी मठ करायला निघालेले मुख्यमंत्री काय बोलले असतील? जे मुख्यमंत्री चार्टर घेऊन जातात त्यांनी वेळेत पोहोचायला हवं,' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

'हे होत असताना कोणासोबत भेटी झाल्या हे समोर आलेलं नाही. ज्या कंपन्यांसोबत एमओयू करण्यात आलं त्या कोण आहेत? ही धूळफेक आहे, लोकांची फसवणूक आहे. जे एमओयू साईन केले तेच तिथे जाऊन घोषणा केली. उद्योग मंत्र्यांनी एक-दोन व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये संवाद साधला,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Eknath Shinde