Home /News /maharashtra /

"कोकणात जाईल तिथे शिवसेना... काही वर्षांपूर्वी कोकणातील घाण आपण पळवून लावली" आदित्य ठाकरेंचा थेट भाजपवर निशाणा

"कोकणात जाईल तिथे शिवसेना... काही वर्षांपूर्वी कोकणातील घाण आपण पळवून लावली" आदित्य ठाकरेंचा थेट भाजपवर निशाणा

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी नाणार आणि जैतापूर प्रकल्पांवरही भाष्य केलं आहे.

रत्नागिरी, 29 मार्च : राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे कोकणच्या दौऱ्यावर (Konkan tour) आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात लांजा तालुक्यात शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात (Shiv Sena karyakarta melava) भाषण करताना थेट भाजपवर हल्ला चढवला आहे. कोकणातील नाणार, जैतापूर प्रकल्प, तसेच कोकणातील पर्यावरण, रोजगार या विषयांवरही भाष्य केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, कोकणात जिथे जाईल तिथे शिवसेना आहे. काही वर्षांपूर्वी कोकणातील घाण आपण पळवून लावली. मुंबई आणि कोकण, महाराष्ट्राचा विकास कसा होईल यावर शिवसैनिक विचार करत असतो. 10 वर्षांपूर्वी जेव्हा यायचो त्यावेळी राजकीय लढा आपण देत होतो. आता जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळी तीन दिवसांत पूर्ण कोकण दौरा होत होता. पण 2014 ला आपण विजयाचा नारळ फोडला आणि त्यासोबतच विकासाचाही नारळ फोडला. तेव्हापासून कोकणाच्या विकासाची दारं खुली झाली. आता हा माझा तीन दिवसांचा दौरा आहे तो यापुढे सहा ते सात दिवसांचा दौरा आखावा लागेल. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, आपलं सरकार बनल्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री या तिघांनीही ठरवलं की कोकणाला वर्षांनूवर्षे आपण पर्यटनाचा दर्जा दिला आहे पण खरोखर इतक्या वर्षात ते झालं आहे का? हा विचार करण्याचा प्रश्न आहे. कोकणासाठी पर्यटन आणि पर्यावरण दोन्ही महत्त्वाचे आहे. माझी दोन्ही खाती कोकणासाठी सर्वाधिक महत्वाची आहेत. कोकणात इतकी वादळे, नैसर्गिक संकटे येत नव्हती. याचे मूळ वातावरण बदल आहे. याचा सर्वाधिक परिणाम कोकणावर होतोय. वाचा : शरद पवारांचा असाही साधेपणा, विमान प्रवासातला PHOTO VIRAL पुढील पाच वर्षात सिंधुरत्न योजनेमुळं प्रत्येकाच्या चेह-यावर हास्य असेल. कोकणात होम स्टे पॉलिसी आणणार आहोत. स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार कसा मिळेल यावर आमचा भर असेल. मुंबईवरचा भगवा हा कोकणी माणसांमुळेच आहे. नाणारमध्ये होणार नाही म्हणजे नाही, कुठलाही प्रकल्प हा स्थानिकांना विश्वासात घेवूनच करू असंही आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपसोबत युतीवर आदित्य ठाकरे काय म्हणाले? पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन कोकण विकासाच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'त्यांच्याकडून जी वागणूक दिली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कुटुंबावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे? असं म्हणत पुढील काळात भाजपशी मैत्रीचा विषय आदित्य ठाकरेंनी संपवला. 'राजकीय षडयंत्र सुरू आह, बिगर भाजप राज्यात सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला जात आहे. पण टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत घाणेरडं राजकारण थांबला पाहिजे. हातात राज्याची सत्ता नसल्यामुळे नैराश्यातून हे सुरू आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Aaditya thackeray, BJP, Konkan, Narayan rane

पुढील बातम्या