मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दुकानात गावठी कट्टा सापडला आणि प्रदीपचा मृत्यदेह, पण गोळी झाडली कुणी?

दुकानात गावठी कट्टा सापडला आणि प्रदीपचा मृत्यदेह, पण गोळी झाडली कुणी?

प्रदीप पागिरे हा तरुण आपल्या दुकानात काम करत होता. पण अचानक दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज आला.

प्रदीप पागिरे हा तरुण आपल्या दुकानात काम करत होता. पण अचानक दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज आला.

प्रदीप पागिरे हा तरुण आपल्या दुकानात काम करत होता. पण अचानक दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज आला.

अहमदनगर, 31 जानेवारी : अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावठी कट्यातून (gavathi katta) गोळी सुटल्यामुळे एका तरुणाचा हाकनाक बळी गेला आहे. पण, या तरुणाचा मृत्यू झाला की हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुंजाळे गावात ही घटना घडली.  प्रदीप एकनाथ पागिरे (वय 25 ) असं मृत तरुणाचे नाव आहे. आज सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गुंजाळे येथे टेलरींग काम करणारा प्रदीप एकनाथ पागिरे हा तरुण आपल्या दुकानात काम करत होता. पण अचानक दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज आला. सदर आवाजाने ग्रामस्थ तसंच त्यांच्या कुटुंबीयांनी दुकानात धाव घेतली असता प्रदीपच्या छातीत गोळी घुसून तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. (कुत्र्याला तोंडाने श्वास द्यायला गेली व्यक्ती अन्...; पुढे काय घडलं पाहा VIDEO) त्यामुळे कुटुंबीय आणि स्थानिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती समजताच श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. (12 जणांकडून सामूहिक बलात्कार, कोर्टाने आरोपींऐवजी तरुणीलाच ठोठावली शिक्षा!) दरम्यान, घटनेच्या अगोदर त्याचा मित्र आणि तो बरोबर असल्याचा घटनास्थळी चर्चा होत होती. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. सदर तरुणाने आत्महत्या केली आहे का? की चुकून गोळी सुटून त्याचा मृत्यू झाला की त्याच्या मित्राकडून गोळी झाडली गेली हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
First published:

पुढील बातम्या