मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : रस्ते दुरुस्त न केल्यामुळे तरुणाने केला गडकरींच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न

BREAKING : रस्ते दुरुस्त न केल्यामुळे तरुणाने केला गडकरींच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न

विजय पवार याने महाराष्ट्राच्या खराब रस्त्यांची अवस्था सुधारले नाहीत तर आत्मदहनाचा इशाराही याआधी दिला होता.

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 01 ऑक्टोबर : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) कामाचा धडका लावत देशभरात रस्ते विकासाचे जाळे पसरवले आहे. परंतु, त्यांच्या जिल्ह्यातील नागपूरमध्ये रस्ते दुरुस्त न केल्याच्या कारणावरून एका इसमाने गडकरी यांच्या घरोसमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय पवार असं पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी आहे. आज संध्याकाळी त्याने नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घरासमोर आत्महदहनाचा प्रयत्न केला.

विजय पवार याने गडकरी यांच्या नागपूर निवासस्थानासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पवार याने गडकरी यांना विनंती केली होती की रस्ते व रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावे. याबद्दल त्याने निवेदनही गडकरींना दिलं होतं. एवढंच नाहीतर विजय पवार याने महाराष्ट्राच्या खराब रस्त्यांची अवस्था सुधारले नाहीत तर आत्मदहनाचा इशाराही याआधी दिला होता.

Royal Enfield ची विक्री 44 टक्क्यांनी घटली; सप्टेंबरमध्ये इतक्याच बुलेटची विक्री

आज संध्याकाळी विजय पवार हा गडकरींच्या निवासस्थानाबाहेर आला होता. त्यावेळी आरडाओरडा करत त्याने विष प्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी  पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने विजय पवारला ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं आहे.  त्याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

नागपूरमध्येच नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Nagpur, Nitin gadkari, नितीन गडकरी