पतीला फारकत दे, मुलाबाळांसह तुला सांभाळतो, असं सांगून तरुणाने विवाहितेशी केलं भलतंच

पतीला फारकत दे, मुलाबाळांसह तुला सांभाळतो, असं सांगून तरुणाने विवाहितेशी केलं भलतंच

पीडित महिलेचा पती भारतीय लष्करात आहे. तो जम्मू-काश्मीर येथे कार्यरत आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 31 मे: औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोनानं थैमान घातल असताना एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाच्या आमिषाला बळी पडून विवाहितेनं आपलं सर्वस्व गमावलं आहे.

'पतीला फारकत दे, मुलाबाळांसह तुला सांभाळतो, असं आमिष आरोपीनं पीडित महिलेला सांगून तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी हर्सुल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा..कोविड-19: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झालेल्या रकमेबाबत आश्चर्यकारक माहिती आली समोर

रोहन चंद्रकांत कुंटलगारलू (वय, 25, रा.जयभवानीनगर, एन-4, सिडको) असं आरोपीचं नाव आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पीडितेचा पती लष्करात..

मिळालेली माहिती अशी की, पीडित महिलेचा पती भारतीय लष्करात आहे. तो जम्मू-काश्मीर येथे कार्यरत आहे. या विवाहितेला एक मुलगी आणि मुलगा असे दोन आपत्य आहेत. आरोपी आणि पीडित महिलेची एक वर्षापूर्वी ओळख झाली होती. नंतर आरोपी आणि महिला अधून-मधून भेटत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते. पतीला फारकत दे, मी तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतो, असं आरोपीनं सांगून विवाहितेचा लैंगिक छळ केल्याचं पीडितेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पीडित महिलेचा पती गेल्या मार्च महिन्यात सुटीवर आला होता. आपल्या पत्नीचे तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचे त्याला समजलं. त्यामुळे त्याने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं. नंतर पीडिता आरोपी रोहनकडे गेली. घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. तेव्हाही त्याने पीडितेला लग्न करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, तेव्हापासून आरोपी रोहन फरार आहे.

हेही वाचा.. 'नमस्ते ट्रम्प'मुळे देशात पसरला कोरोना, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

आता तर पीडितेला तिच्या आई-वडिलांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. अखेर पीडितेने आरोपीविरुद्ध हर्सुल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे करत आहेत.

First published: May 31, 2020, 9:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading