BREAKING: जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडलं, जागीच मृत्यू

जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 10:46 AM IST

BREAKING: जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडलं, जागीच मृत्यू

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 30 सप्टेंबर : सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीचा अपघाता झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका तरुणाला उडवलं. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांआधी हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघाता झाला होता. या अपघातामध्ये 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता.

जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे. भर दिवसा हा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

श्याम होळे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृत तरुण हा बार्शीतील शेलगाव होळे गावातील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांकडू देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर तानाजी सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी जमावाकडून करण्यात आली आहे.

Loading...

इतर बातम्या - धक्कादायक! घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना बाहेर 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

सगळ्यात धक्कादायक म्हणजे कोणाला अपघाताबद्दल समजू नये यासाठी तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांकडून गाडीची नंबर प्लेट काढून ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांआधी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला मोठा अपघात झाला होता. या अपघातात दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. विनोद झाडे आणि फलजी भाई पटेल हे मृत्यू झालेल्या सुरक्षा कर्मींची नावं आहेत. झाडे हे पोलिस विभागाचे तर पटेल हे सीआरपीएफचे जवान होते. हंसराज अहिर हे ताफ्यासह चंद्रपूर येथून नागपूर विमानतळावर दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले होते. तेव्हा हा अपघाता झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

इतर बातम्या - भाजप देणार विद्यमान आमदारांना धक्का, या मतदारसंघातून तिकीट कापण्याची शक्यता!

महामार्गावरून जात असताना वर्धा जिल्ह्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर हा अपघात झाला. अहिर बसून असलेले वाहन पुढे गेल्यावर अचानक जनावर आडवे आल्याने पुढचा कंटेनर अनियंत्रित झाला. यामागचे सुरक्षा वाहन भरधाव वेगातील कंटेनरला धडकले. यात दोन जवान गंभीर जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाला होता. पोलीस आता या संपूर्ण अपघाताची चौकशी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...