मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कष्टाने पिकविलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने तरुण शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय

कष्टाने पिकविलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने तरुण शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय

बीड मधील घटना

बीड मधील घटना

मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने तरुण शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचललं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सुरेश जाधव, बीड

बीड, 8 मार्च : सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने, शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसे फेडावे या काळजीने 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीड तालुक्यातील बोरखेड येथे घडली आहे. संभाजी अर्जुन अष्टेकर (वय 25 वर्ष ) असं तरूण शेतकऱ्याच नावं आहे. पाच एकर जमीन असून, त्यानी आपल्या तीन एकर शेतात कांद्याचे पीक घेतले होते. कांद्याला पाणी द्यायचं म्हणून रात्री शेतात गेला आणि परत वापस आलाच नाही.

वाचा - Beed News: अवकाळी पावसानं आणलं डोळ्यात पाणी, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला! Photos

आपल्या शेतात पिकविलेल्या कांदा पिकाला यंदा बाजारात भाव नसल्याकारणाने, आता आपण घेतलले 3 लाख कर्ज कसे फेडणार या काळजीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. कांद्याला भाव नसल्याने राज्यातील शेतकर्‍यांत संताप व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यातही अनेक कांदा उत्पादक शेतकरी आहेत. बोरखेड येथील संभाजी अर्जुन आष्टीकर (वय 25 वर्ष) या शेतकर्‍याने कांदा लावला होता. कांद्याला भाव मिळत नसल्याने सदरील शेतकर्‍याने रात्री आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संभाजीच्या घरामध्ये वृध्द आई-वडील, भोळसर भाऊ, विधवा बहीण यांचेसह त्याचे कुटंबीय त्याच्यावर अवलंबून होते, त्यामुळे अष्टेकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कांदा उत्पादक शेतकरी हातबल होत असून सरकारने तातडीने हमीभावाने कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर तरी सरकारला जाग येईल का? असा प्रश्न लोक विचारत आहेत.

अवकाळी पावसाने नुकसान

शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही अनेकदा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते. यंदा वरुण राजानं चांगली हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी आता पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.

First published:
top videos

    Tags: Farmer, Suicide