धक्कादायक: दांडक्याने मारहाण केल्याने महिलेचा अडीच महिन्यांचा गर्भपात

धक्कादायक: दांडक्याने मारहाण केल्याने महिलेचा अडीच महिन्यांचा गर्भपात

शहरातील जुने धुळे परिसरात एक धक्कादायक घटना समोर...

  • Share this:

धुळे, 13 ऑक्टोबर- शहरातील जुने धुळे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडणात झालेल्या मारहाणीत महिलेचा अडीच महिन्यांचा गर्भपात झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गायकवाड चौकात झालेल्या विनयभंग प्रकरणानंतर आता दुसऱ्या गटानेही तक्रार दिली आहे. मारहाण केल्यामुळे अडीच महिन्याचा गर्भपात झाल्याची तक्रार पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

शहरातील गायकवाड चौकातील महिलेचा 9 ऑक्टोबर रोजी विनयभंग करण्यात आला होता. मागील भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला होता. यासंदर्भात आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेनंतर दुसऱ्या गटानेही तक्रार दिली आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मागील भांडणाचे कारण पुढे करून हेमंत गुलाबराव पवार, पोर्णिमा हेमंत पवार, सनी उर्फ आदित्य अन्ना जाधव, कुणाल गुलाब पवार, अमोल संजय पगारे, विशाल संजय पगारे यांनी वाद घातला होता. तसेच दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीमुळे गर्भपात झाल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे.

पोलिस चौकीमागेच तीन मिनिटांत 35 हजारांची चोरी

चितोड रोड पोलिस चौकीच्या मागे असलेल्या मेडिकलचे शटर उचकटून अवघ्या तीन मिनिटात ३५ हजारांचे साहित्य लांबवण्यात आले. पहाटे सव्वा तीनच्या सुमारास ही चोरी झाली. दोन्ही चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला आहे. पहाटे घडलेल्या घटनेबद्दल तब्बल 15 तासांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे मध्यरात्री बंद असलेल्या पोलिस चौक्यांचे वास्तव पुन्हा समोर आले आहे.

चितोड रोडवरील पोलिस चौकीच्या मागे विनोद बाविस्कर यांचे प्रभा मेडिकल आहे. वैभवनगरात राहणारे विनोद बाविस्कर यांनी शुक्रवारी रात्री दुकान बंद केले. यानंतर पहाटे दुकानाचे शटर उचकटून ठिक 3 वाजून 12 मिनिटांनी दोन चोरटे आत शिरले. त्यापैकी एकाने तोंडावर रुमाल बांधला होता. दुकानातील सात ते आठ हजारांची रोकड, महागडा लॅपटॉप व इतर साहित्य घेऊन अवघ्या तीन मिनिटात दोघा चोरट्यांनी हातसफाई केली. यानंतर ठिक 3 वाजून 15 मिनिटांनी हे चोरटे बाहेर पडले. हा संपूर्ण प्रकार मेडिकलमधील सीसीटीव्हीने टिपला आहे. या घटनेत 25 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला आहे.

VIDEO: 40 वर्षांत तुम्ही काय केलं? गवत उपटलं; पक्ष सोडून गेलेल्यांवर पवारांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: women
First Published: Oct 13, 2019 07:37 PM IST

ताज्या बातम्या