कोरोनाविरोधात यशस्वी लढा दिला पण दुसऱ्या आजाराने गाठलं; सांगलीत 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोनाविरोधात यशस्वी लढा दिला पण दुसऱ्या आजाराने गाठलं; सांगलीत 62 वर्षीय महिलेचा मृत्यू

10 ते 12 दिवसांपूर्वीच कोरोनावर मात करुन ही महिला घरी इस्लामपूरमध्ये परतली होती.

  • Share this:

सांगली, 1 मे : कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झालेल्या इस्लामपूरमधील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचे जे पहिले रुग्ण इस्लामपूरात सापडले होते त्यामध्ये या महिलेचा समावेश होता. 10 ते 12 दिवसांपूर्वीच कोरोनावर मात करुन ही महिला घरी इस्लामपूरमध्ये परतली होती. मात्र कोरोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

सदर महिलेच्या गुरुवारी रात्री छातीत दुखू लागले होते. त्यानंतर तिला उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज पहाटे तिचे निधन झाले. महिलेचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्याने झाल्याचे माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात आणखी एक जण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील 40 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याची माहिती गुरुवारी रात्री समोर आली आहे. हा व्यक्ती मुंबईतील मानखुर्द इथं भाजीपाला विक्रीचे काम करत होता. 27 एप्रिल रोजी तो मुंबईहून सोलापूर मार्गे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी या त्याच्या मामाच्या गावी आला होता.

हेही वाचा - RED ZONEची नवी यादी; यानुसारच निर्बंध करणार शिथिल, तुमचा जिल्हा कुठल्या झोनमध्ये?

जिल्हा परिषदेच्या फिव्हर क्लिनिकच्या तपासणीत हा व्यक्ती संशयित आढळून आल्याने त्याचे swab घेतले होते. दुधेभावी गावातील काही भाग सील करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळी दिवस या भागातील नागरिकांना आणखी काळजी घ्यावी लागणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 1, 2020, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading