पुण्यातील 'या' गावाने केली कमाल, अनोख्या पॅटर्नमुळे आतापर्यंत एकही रुग्ण नाही!

पुण्यातील 'या' गावाने केली कमाल, अनोख्या पॅटर्नमुळे आतापर्यंत एकही रुग्ण नाही!

पुणे जिल्ह्यातील एका गावाने मात्र एक शक्कल लढवत या रोगाला दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.

  • Share this:

पुणे, 5 जून : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला मेटाकुटीला आणलं आहे. महाराष्ट्रातीलही मुंबई-पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या धोकादायक संकटावर नक्की उपाय काय? असा हतबल करणारा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील एका गावाने मात्र एक शक्कल लढवत या रोगाला दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये मोठी लोकसंख्या असतानाही आजपर्यंत या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. याला कारण ठरलं गावाने राबवलेला अनोखा पॅटर्न. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला हवं, असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र आपल्याच लोकांपासून दूर जाणं अनेकांना कठीण होत आहे. तसंच नेहमीच्या गप्पांचा मोह टाळायलाही काहींना नको वाटतो. त्यातूनच मग सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो.

एकीकडे राज्यातील विविध भागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असताना मंचरने मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी एक युक्ती वापरली. या गावातील बहुंताश नागरिक सार्वजनिक ठिकाणी जाताना छत्रीचा वापर करतात. डोक्यावर छत्री असल्यामुळे इतरांपासून आपण विशिष्ट अंतरावर तर थांबतोच, तसंच ऊन आणि पावसापासूनही बचाव होतो. यासह प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे गाव आजपर्यंत कोरोनापासून दूर राहण्यास यशस्वी ठरलं आहे. याबाबत 'दिव्य मराठी'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, या गावाला छत्रीबाबतची ही आयडियाची कल्पना सुचली ती केरळपासून. केरळमधीलही काही गावांनी सोशल डिस्टन्सिंगसाठी छत्रीचा वापर केला होता. त्याची माहिती कानावर आल्यानंतर मंचरनेही अनुकरण केलं आणि पुण्यासारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटपासून जवळ असूनही कोरोनामुक्त होण्याची किमया केली.

First published: June 5, 2020, 9:55 PM IST

ताज्या बातम्या