• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय सिद्धार्थचा अंत, एकटं घरी सोडणे जिवावर बेतले

खड्ड्यातील पाण्यात बुडून 2 वर्षीय सिद्धार्थचा अंत, एकटं घरी सोडणे जिवावर बेतले

घरी परत आल्या नंतर दोघांना सिद्धार्थ दिसत नव्हता. त्यामुळे शोधा शोध सुरू झाली. पण सिद्धार्थ कुठेही दिसून आला नाही.

घरी परत आल्या नंतर दोघांना सिद्धार्थ दिसत नव्हता. त्यामुळे शोधा शोध सुरू झाली. पण सिद्धार्थ कुठेही दिसून आला नाही.

घरी परत आल्या नंतर दोघांना सिद्धार्थ दिसत नव्हता. त्यामुळे शोधा शोध सुरू झाली. पण सिद्धार्थ कुठेही दिसून आला नाही.

 • Share this:
  यवतमाळ, 04 ऑगस्ट : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या वणी शहरातील गोकुळनगर परिसरात असलेल्या एका  खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन वर्षीय बालकाचा (drowned) अंत झाला आहे. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सुनील पोटे असं  मृतक बालकाचं नाव आहे. सुनील आपल्या परिवारासह गोकुल नगर येथील रहिवासी असून मोल मजुरी करून तो आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करतो.  4 सप्टेंबर रोजी सुनील कामासाठी बाहेर गेला होता. तर पत्नी सविता सुद्धा कामा निमित्य बाहेर गेली होती. हॉटेलमध्ये युवा नेत्याची आत्महत्या; मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ घरी परत आल्या नंतर दोघांना सिद्धार्थ दिसत नव्हता. त्यामुळे शोधा शोध सुरू झाली. पण सिद्धार्थ कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे घराच्या मागील भागत असलेल्या खड्ड्यात तर पडला नसावा, असा अंदाज व्यक्त करत काही लोकांच्या मदतीने खड्यातील पाण्यात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. मंदिरं उघडण्याबद्दल तारतम्य बाळगा, शरद पवारांचा भाजपला सल्ला पाण्याच्या खड्यात बुडून सिद्धार्थचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. मृत सिद्धार्थचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.  पोलिसांनी या प्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद केली आहे. नांदेडमध्ये नाल्याच्या पाण्यात महिला गेले वाहून! तर दुसरीकडे, राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी नदी आणि नाल्यांना पूर आला आहे. नांदेडमध्येही पावसाने धुमशान घातले आहे. भोकर तालुक्यात पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. भोकर तालुक्यातील डौर गावात एक 42 वर्षीय महिला नाल्याच्या पुरात वाहून गेली आहे. लक्ष्मीबाई चंदापुरे असं  वाहून गेलेल्या महिलेचं नाव आहे. शेतातून परत येताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही महिला पाण्यात वाहून गेली. या महिलेचा शोध सुरू आहे.
  Published by:sachin Salve
  First published: