मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

खरा शिवसैनिक 'त्या' एका गोष्टीसाठी पंतप्रधान मोदींसोबत येईल, भाजप खासदाराचा दावा

खरा शिवसैनिक 'त्या' एका गोष्टीसाठी पंतप्रधान मोदींसोबत येईल, भाजप खासदाराचा दावा


'राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने मतपरिवर्तन होईल आणि याचे परिणाम हे महाविकास आघाडी सरकारवर दिसतील'

'राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने मतपरिवर्तन होईल आणि याचे परिणाम हे महाविकास आघाडी सरकारवर दिसतील'

'राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने मतपरिवर्तन होईल आणि याचे परिणाम हे महाविकास आघाडी सरकारवर दिसतील'

अहमदनगर, 01 ऑगस्ट :  राम मंदिर भूमिपूजनावरून राजकीय आखाडा तापला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादात आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उडी घेतली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर सुजय विखेंनी मोठा दावा केला आहे.

'फडणवीसांचे मुहूर्त कायम चुकीचेच, त्यांना काय झालंय हेच समजत नाही'

'शिवसेनेचा कट्टर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. हा कार्यकर्ता राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत एकत्र येणार आहे', असा दावा विखेंनी केला आहे.

'जर सेनेच्या नेतृत्वाने आपला स्वाभिमान गहाण ठेवला असेल तरीही कट्टर शिवसैनिक सेनेची स्थापन ज्यासाठी झाली आहे, त्या राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसैनिकांनी आंदोलनं केली होती, जेलमध्ये गेली होती. ते सर्व कट्टर कार्यकर्ते हे राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व स्वीकारतील, असा दावाही सुजय विखेंनी केला आहे.

'राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने मतपरिवर्तन होईल आणि याचे परिणाम हे महाविकास आघाडी सरकारवर दिसतील', असंही सुजय विखे म्हणाले.

ssr suicide case : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव व 10 रुपये अनुदान,दुध भुकटीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावा, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खते,बी बियाणे मिळावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीज बील माफ करावे आदी मागण्यांसाठी विविध तालुक्यात भाजपने आणि शेतकरी संघटनांनी आंदोलने केली.

खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डीत तर माजी मंत्री राम शिंदे यांनी नगर सोलापूर महामार्गावर आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभे राहून शेतकऱ्यांना मोफत दूध वाटप करून आंदोलन करत महाविकास आघाडीचा निषेध केला.

First published:

Tags: Sujay Vikhe Patil, Uddhav Thackery, शिवसेना, सुजय विखे पाटील